Friday, July 5, 2024

चेक बाऊन्स प्रकरणी अमिषा पटेलला धक्का, उच्च न्यायालयाने फेटाळली अभिनेत्रीची याचिका

रांचीतील एका व्यक्तीची ५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी खटल्याचा सामना करणारी चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha patel) हिला मोठा धक्का बसला आहे. हा खटला रद्द करण्यासाठी त्यांनी झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, परंतु न्यायालयाने गुरुवारी (५ मे) रोजी त्यांची याचिका फेटाळली.

रांचीचे रहिवासी चित्रपट निर्माते अजय कुमार सिंह यांनी आरोप केला आहे की अमिषा पटेलने चित्रपटांमध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष दाखवून आपली फसवणूक केली आहे. या संदर्भात त्यांनी रांचीच्या कोर्टात या अभिनेत्रीविरुद्ध खटला दाखल केला होता. अजय कुमार सिंहच्या म्हणण्यानुसार, २०१७ मध्ये अमिषा रांचीच्या हरमू हाउसिंग कॉलनीमध्ये एका कार्यक्रमासाठी आली होती. यादरम्यान त्यांनी अभिनेत्रीची भेट घेतली.

अमिषाने त्याला चित्रपटात पैसे गुंतवण्याची ऑफर दिली. देसी मॅजिक नावाच्या चित्रपटासाठी त्यांनी अमिषाला पाच कोटी रुपये दिले. चित्रपट रखडल्यावर तिने पैसे परत मागितले तेव्हा अमिषाने तीन कोटींचा चेक दिला, पण तो बाऊन्स झाला. या तक्रारीविरोधात अमिषाच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

 

हे देखील वाचा