Thursday, April 18, 2024

जिया खान आत्महत्या केस: अभिनेता सुरज पांचोलीची निर्दोष मुक्तता

बॉलिवूड अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणातून अभिनेता सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. १० वर्षांनी या प्रकरणावर आज २८ एप्रिल रोजी कोर्टाने त्यांचा निर्णय दिला आहे. विशेष सीबीआय न्यायालयात हा निर्णय देण्यात आला आहे. ३ जून २०१३ रोजी जिया तिच्या घरात मृतावस्थेत सापडली होती. त्यानंतर तिचा बॉयफ्रेंड अभिनेता सुरज पांचोलीवर तिला आत्महत्येसाठी उकसवण्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

जिया खान आत्महत्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली होती. २० एप्रिल रोजी न्यायाधीश एएस सय्यद यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेत अंतिम निकाल राखून ठेवला होता. तो निकाल आज न्यायालयाने दिला आहे. अभिनेता सूरज पांचोलीला सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. या निकालावेळी कोर्टात जीवाची आई राबिया खान देखील उपस्थित होत्या. राबिया यांनीच सुरज विरोधात जिला आत्महत्येसाठी उकसवण्याची आणि तिचा शारीरिक, मानसिक छळ केल्याची तक्रार दाखल केली होती. राबिया खान यांच्याच याचिकेवर मुंबई पोलिसांकडून ही केस सीबीआयकडे सोपवण्यात आली होती.

‘पुराव्यांअभावी सूरज दोषी नसल्याचे सिद्ध झाले’ असे सांगत सीबीआय न्यायालयाने निर्णय सुनावताना सांगितले. हा निकाल आल्यानंतर अभिनेता सुरज पांचोलीने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीमध्ये लिहिले, “सत्याचा नेहमीच विजय होतो.”

सुरज निर्दोष सुटल्यानंतर राबिया खान यांनी सांगितले की, “ही लढाई सुरूच राहणार आहे. मी सुरुवातीपासून म्हणते ही केस आत्महत्या नाही तर खुनाची आहे. मी कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान ठेवते. आम्ही हाय कोर्टात या निर्णयाला आव्हान देऊ. मी आई आहे, आणि मी माझ्या मुलींसाठी लढणार.”

दरम्यान जिया खानने २००७ साली अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘निशब्द’ चित्रपटातून पदार्पण केले. तेव्हा ती २१ वर्षांची होती. त्यानंतर ती आमिर खानच्या ‘गजनी’मध्ये दिसली. पुढे तिने अक्षय कुमारसोबत हाऊसफुल सिनेमात देखील काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

धक्कादायक! ‘या’ सुपरस्टार अभिनेत्याला निर्मात्यांनी केले बॅन, अभिनेत्याची लिखित प्रतिक्रिया व्हायरल

जेलमधील ‘त्या’ कटू अनुभवांना सांगताना क्रिसनला अश्रू अनावर, कॉफीसाठी टॉयलेटचे पाणी तर…

हे देखील वाचा