मराठी इंडस्ट्रीमधील खऱ्या अर्थाने अष्टपैलू आणि बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणे अभिनेता जितेंद्र जोशी. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच तो एक उत्तम कवी, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक देखील आहे. काही महिन्यांपूर्वीच त्याचा ‘गोदावरी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. माणसाच्या अस्तित्वहीन आणि भरकटलेल्या आयुष्याला ‘गोदावरी’ने तिच्या प्रवाहसोबतच दिशा देण्याचे काम केले आहे. परिस्थिती कशीही असली तरी ती तिचा प्रवाह आणि वाहणे कधीच सोडत नाही. अतिशय उत्तम आणि सकारत्मक संदेश देणाऱ्या या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव तर घेतला, सोबतच विविध राष्त्री, अंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर देखील मोहोर उमटवली.
View this post on Instagram
View this post on Instagram
नुकताच मुंबईमध्ये २७ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हल(SCO) संपन्न झाला. या फेस्टिवलमध्ये सहभागी झालेल्या १४ चित्रपटांपैकी सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून ‘गोदावरी’ या सिनेमाची निवड करण्यात आली. मराठी सिनेसृष्टीसाठी आणि चित्रपटांसाठी ही खूपच अभिमानाची आणि आनंदाची बाब ठरली आहे. या फेस्टिवलमध्ये देशातील अतिशय उत्तम कलाकृतींचा सहभाग होता. यात गोदावरी या मराठी चित्रपटाला बेस्ट फिल्म म्हणून पुरस्कार मिळणे ही खूपच गर्वाची बाब आहे.
हा पुरस्कार राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या सहकार्याने आयोजित शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रसून जोशी आणि आर माधवन यांच्या हस्ते गोदावरी चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन आणि जिओ स्टुडिओजचे मराठी कंटेंट हेड निखिल साने यांना प्रदान करण्यात आला. यावेळी सिनेमातील कलाकार जितेंद्र जोशी, गौरी नलावडे आणि इतर टीम देखील उपस्थित होती.
तत्पूर्वी प्रत्येक कुटुंबाला जोडणारा सिनेमा म्हणून ‘गोदावरी’ सिनेमा ओळखला जात आहे. या सिनेमात जितेंद्र जोशी, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. गोदावरी हा सिनेमा केवळ देशातच नाही आंतरराष्ट्रीय सिनेमा महोत्सवातही झळकला आहे. इफ्फी महोत्सवात ‘गोदावरी’ सिनेमानं आंतरराष्ट्रीय स्तरावरही लौकिक मिळवला आहे. तर न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल (NYIFF), वॅनकोवर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, न्यूझीलंड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, एफआयपीआरईएससीआय – इंडिया ग्रँड प्रिक्स अशा अनेक महोत्सवात ‘गोदावरी’ ने आपला ठसा उमटवला आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘हे तर काहीच नाय’ शोमध्ये प्रेक्षकांना रमेश देव यांना अनुभवायची मिळणार शेवटची संधी, निधनापूर्वी लावली होती शोमध्ये हजेरी
चित्रपटांपासून दूर असूनही बक्कळ पैसा कमावते शमिता शेट्टी; पण मिळवू शकली नाही बहीण शिल्पासारखं यश