Tuesday, June 6, 2023

Jugjugg Jiyo | धमाकेदार चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ, कियारापेक्षा अनिल कपूरसोबत जमली वरुण धवनची जोडी

वरुण धवन (Varun Dhawan) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) सध्या त्यांच्या ‘जुग जुग जियो’ या चित्रपटामुळे बरेच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीझ करण्यात आले होते. जे पाहून चाहत्यांना या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता लागली आहे. ट्रेलरची वाट पाहत चाहत्यांनी चित्रपटाचे मोठे कटआउट्स लावले देखील लावले होते. अशातच आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ झाला आहे.

हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. ट्रेलरमध्ये अनिल कपूर (Anil Kapoor) आणि वरुण धवनची जोडी शानदार दिसत आहे. या चित्रपटात वरुण आणि कियारा हे विवाहित जोडपे म्हणून दाखवण्यात आले आहेत. तसेच चित्रपटात अनिल कपूरसोबत नीतू कपूरही (Neetu Kapoor) दिसणार आहे. निर्मात्यांनी ट्रेलरपूर्वी शनिवारी चित्रपटाचे पोस्टर देखील शेअर केले. (multistarrer family drama jugjugg jiyo trailer release)

ट्रेलरची सुरुवात वरुण आणि कियाराच्या लग्नापासून होते. ज्यामध्ये वधूच्या भूमिकेत कियारा आणि वराच्या भूमिकेत वरुण खूपच छान दिसत आहेत. ट्रेलर पाहून असे दिसते की, दोघेही त्यांच्या लग्नावर नाराज आहेत आणि घटस्फोट घेण्याचा विचार करत आहेत. या चित्रपटात अनिल कपूर वरुण धवनच्या वडिलांची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये, कियारा अडवाणीपेक्षा वरुण धवनची जोडी अनिल कपूरसोबत अधिक जमत आहे. याशिवाय मनीष पॉल (Manish Paul) आणि प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) हे स्टार्सही या चित्रपटात दिसत आहेत.

ट्रेलर रिलीझ होऊन काही काळच लोटला आहे. एवढ्या कमी वेळात ‘जुग जुग जियो’च्या ट्रेलरला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या फॅमिली ड्रामा चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ बनली आहे.

या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ आहे की, शनिवारी गाझियाबाद आणि आग्रा येथे चाहत्यांनी चित्रपटाच्या स्टारकास्टचे मोठे कटआउट्स लावले होते. गाझियाबादमध्ये ५० फुटांचे कटआउट लावण्यात आले, तर आग्रा येथे २५ फुटांचे पोस्टर लावण्यात आले. करण जोहर (Karan Johar) या चित्रपटाची निर्मिती व्हायकॉम १८ च्या सहकार्याने करत आहे. या चित्रपटात प्रथमच वरुण आणि कियारा यांची जोडी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २४ जूनला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा