Monday, June 24, 2024

“स्मार्टनेस दाखवण्याआधी तुम्ही…”; ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’च्या आयोजकांवर गायक कैलाश खेर संतापले

बॉलिवूडमधील पार्श्वगायक आणि परफॉर्मर कैलाश खेर भारतातील सर्वात जास्त डिमांडिंग आर्टिस्ट आहे. त्याला नुकतेच लखनऊमधील ‘खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्स 2023’ मध्ये परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित केले होते. या कार्यक्रमाचे उदघाट्न खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. मात्र कैलाश खेर यांचा या कार्यक्रमाचा अनुभव खूपच खराब होता आणि त्यांनी आयोजकांवर चांगलीच नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावरही याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

https://twitter.com/Pt_shekhardixit/status/1661809288128630784?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1661809288128630784%7Ctwgr%5E6238b0b436a9700bc845deaf2509a7822bd05522%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmanoranjan%2Fbollywood%2Fkailash-kher-scold-organizer-of-khelo-india-university-games-in-lucknow-video-virul-dpj-91-3681614%2F

‘खेलो इंडिया यूनिवर्सिटी गेम्स 2023’ या कार्यक्रमाच्या लाँच सोहळ्यामध्ये कैलाश खेर यांनी त्यांच्या काही गाजलेल्या गाण्यांवर परफॉर्म केले. मात्र त्याआधी लखनऊमध्ये निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे ते कार्यक्रमस्थळी जवळपास तासभर उशिरा पोहचले. या गैरसोयीमुळे त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्यांच्या हातात माइक येताच सर्वात आधी तो राग व्यक्त केला. ते म्हणाले, “तुम्ही स्मार्टनेस दाखवत असता ना, मात्र त्याआधी शिष्टाचार शिका. मला एक तासभर थांबायला लावले, हे खेलो इंडिया काय आहे? काम कसे करायचे असते, ते कुणालाच कळत नाही. मला वाटेल तर एवढे बोलेल मात्र सोडा सर्व. माझ्यासाठी भारत आणि तिथे राहणारे नागरिक पूजनीय आहे. मात्र व्यवस्था योग्य असावी. नाहीतर सर्व चुकते आणि कार्यक्रम खराब होतो.” मोठ्या मुश्किलीने कैलाश खेर शांत झाले आणि त्यांनी परफॉर्म केले.

दरम्यान ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२३’ ही देशातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा मानली जाते. यावर्षी लखनऊ येथील बीबीडी विद्यापीठात २५ मे पासून या स्पर्धेस सुरुवात झाली असून, ३ जून रोजी वाराणसीच्या बनारस हिंदू विद्यापीठात स्पर्धेचा समारोप होणार आहे.

हे देखील वाचा