Friday, March 6, 2026
Home साऊथ सिनेमा काजल अग्रवालने पहिल्यांदाच दाखवला तिच्या चिमुकल्याचा चेहरा, पाहा आई आणि मुलाचा गोंडस फोटो

काजल अग्रवालने पहिल्यांदाच दाखवला तिच्या चिमुकल्याचा चेहरा, पाहा आई आणि मुलाचा गोंडस फोटो

अभिनेत्री काजल अग्रवालने (Kajal Aggarwal) १९ एप्रिलला एका मुलाला जन्म दिला, ज्याचे नाव तिने नील किचलू ठेवले आहे. सध्या अभिनेत्री तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदी क्षणांचा आनंद घेत आहे. अभिनेत्रीने इंस्टाग्रामच्या माध्यमातून मुलगा नीलसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. परंतु आतापर्यंत तिने आपल्या लाडक्याचा चेहरा दाखवला नव्हता, अशा परिस्थितीत, चाहते तिचा मुलगा नीलला पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. मात्र लेटेस्ट फोटोमध्ये काजल अग्रवालच्या मुलाचा चेहरा देखील दिसत आहे. त्यानंतर चाहत्यांसोबतच सेलिब्रिटी देखील प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.

लेटेस्ट फोटोत, काजल अग्रवाल तिचा मुलगा नीलला गोंजारताना दिसत आहे. या फोटोसोबतच अभिनेत्रीने कॅप्शनमध्येही तिच्या मुलावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. पोस्ट शेअर करत तिने लिहिले की, “नील किचलू लव ऑफ माय लाइफ.” नीलच्या चिमुकल्या हातामुळे त्याच्या चेहऱ्याचा काही भाग दिसत नसला, तरी त्याच्या क्यूटनेसने चाहत्यांची मने जिंकली आहेत. (kajal aggarwal shared her son neil kitchlu picture shows his face)

काजल अग्रवालने तिच्या लाडक्या मुलाचा पहिला फोटो तेव्हा शेअर केला, जेव्हा तो फक्त १८ महिन्यांचा होता. या फोटोतील आई आणि मुलाचे प्रेमळ भावनिक बंध कोणत्याही व्याख्येत किंवा शब्दात बांधता येणार नाहीत. हा फोटो शेअर करताना काजल अग्रवालने तिच्या भावना एका लांबलचक नोटद्वारे शेअर केल्या होत्या.

काजलने साल २०२० मध्ये तिने तिचा बॉयफ्रेंड गौतम किचलूसोबत लग्न केले होते. लॉकडाऊन दरम्यान दोघांनी निवडक पाहुण्यांमध्ये मुंबईत रेशीमगाठ बांधली.

काजलने ‘सिंघम’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात तिने अजय देवगनसोबत मुख्य भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा