×

‘आई होणं तू मला शिकवले’, म्हणत मातृदिनानिमित्त काजल अग्रवालने मुलगा नीलसाठी शेअर केली पोस्ट

आठ मे हा दिवस जगभरात मदर्स डे म्हणून साजरा केला गेला. हा दिवस प्रत्येक आई आणि मुलासाठी खूप खास असतो. या खास प्रसंगी, आता बॉलिवूड आणि साऊथ अभिनेत्री काजल अग्रवालने (Kajal Aggarwal) तिचा मुलगा नीलची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. काजलने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करून चाहत्यांना मुलाची नील किचलूची झलक दाखवली आहे. फोटो शेअर करताना काजलने तिच्या मुलासाठी एक भावनिक पोस्टही लिहिली आहे. जी सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये काजलने तिच्या आणि बाळाच्या सुंदर नात्याचे वर्णन केले आहे.

काजल अग्रवाल आणि पती गौतम किचलू यांनी 19 एप्रिल रोजी मुलगा नीलचे पालक झाल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काजलने आई झाल्यानंतर तिचा अनुभव कसा आहे. याबद्दलही एका पोस्टमध्ये लिहले होते. त्याच वेळी, आता काजल तिच्या मुलावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. याबद्दलची तिची पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने “प्रिय नील, मला सांगायचे आहे की तू माझ्यासाठी किती खास आहेस आणि तू नेहमीच तिथे राहशील. ज्या क्षणी मी तुला माझ्या मिठीत घेतले, तुझा छोटासा हात माझ्या हातात घेतला, तुझा उबदार श्वास अनुभवला आणि तुझ्या सुंदर डोळ्यांकडे पाहिले तेव्हा मला माहित होते की मी तुझ्यावर कायम प्रेम केले आहे.” असे म्हणत आपला आई होण्याचा अनुभव सांगितला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kajal A Kitchlu (@kajalaggarwalofficial)

याबद्दल ती पुढे लिहते की,” येत्या काही वर्षांत मी तुला सर्व काही शिकवण्याचा प्रयत्न करेन, परंतु आतापासून तू मला बर्‍याच गोष्टी शिकवल्या आहेत. आई होणं हे तू मला शिकवलंस. तू मला निस्वार्थ आणि निर्मळ प्रेम करायला शिकवलंस. माझ्या काळजाचा तुकडा माझ्या शरीराच्या बाहेरही असू शकतो माझे हृदय तुटणे देखील शक्य आहे हे तू मला शिकवले आहेस. ही देखील एक भितीदायक गोष्ट आहे, परंतु त्याहूनही सुंदर आहे. मला अजून खूप काही शिकायचे आहे.” दरम्यान काजल अग्रवालची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वत्र चांगलीच व्हायरल होत असून त्यावर अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post