×

Acharya | राम चरणच्या चित्रपटातून बाहेर झाली काजल अग्रवाल, तर ‘बाहुबली’ फेम अभिनेत्रीची एन्ट्री

साऊथ इंडस्ट्रीचा आगामी ‘आचार्य’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात राम चरण (Ram Charan) आणि चिरंजीवी (Chirnjeevi) एकत्र दिसणार आहेत, त्यामुळे चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हा या चित्रपटात चिरंजीवीसोबत काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) दिसणार असल्याचे समोर आले होते. या चित्रपटातील ‘लाहे लाहे’ गाण्यातही काजल दिसली होती. मात्र चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये काजल दिसली नाही, त्यानंतर काजल या चित्रपटात नसल्याची चर्चा होती. या सगळ्यात आता ‘आचार्य’चे दिग्दर्शक कोराताला शिवा यांनी एक मुलाखत दिली आहे, ज्यात त्याने सर्व हकीकत सांगितली आहे.

दिग्दर्शक कोराताला शिवा यांची मुलाखत
दिग्दर्शक कोराताला शिवा यांनी आपल्या ताज्या मुलाखतीत हे सांगितले की, अभिनेत्री ही कोणत्याही चित्रपटाच्या व्यावसायिक पैलूमध्ये प्रेम रूचीसारखी असते. पण आचार्यसारख्या चित्रपटाला प्रेमकथेची गरज नाही आणि लागणारही नाही. सुरुवातीच्या काळात धर्मस्थळीमध्ये काजलची भूमिका विनोदी व्यक्तिरेखा म्हणून दाखवण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र तीन-चार दिवसांच्या शूटिंगनंतर तिच्या भूमिकेबाबत शंका येऊ लागल्या.” (anushka shetty replace kajal aggarwal in ram charan film acharya)

काजलच्या बाहेर पडण्याचे सांगितले कारण
दिग्दर्शकाने पुढे सांगितले, “काजल एक मोठी अभिनेत्री आहे. तिची भूमिका नीट दाखवली पाहिजे. चित्रपटात लव्ह अँगल नाही. तीची भूमिकाही चांगल्या पद्धतीने संपणार नाही. या सर्व गोष्टींमुळे चित्रपटात काजलसोबत ती भूमिका करणे चुकीचे ठरेल. हे अभिनेत्रीच्या किंमतीचे समर्थन करणार नाही. मी तेच काजलला समजावून सांगितले आणि तिनेही माझी चिंता सकारात्मक पद्धतीने समजून घेतली.”

अनुष्का शेट्टीची एन्ट्री!
आता ताज्या वृत्तानुसार, अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) या चित्रपटातील एका गाण्यात दिसणार आहे. मात्र, चिरंजीवीच्या प्रेमगीतमध्ये कोणती अभिनेत्री दिसणार, हे अद्याप निर्मात्यांकडून स्पष्ट झालेले नाही.

कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
‘आचार्य’ चित्रपटाबद्दल सांगायचे तर, चिरंजीवी आणि राम चरण यांच्याशिवाय, पूजा हेगडे, सोनू सूद, जिशु सेनगुप्ता, वेनेला किशोर, सौरव लोकेश, पोसानी कृष्णा मुरली, तनिकेला भरणी, अजय, संगीता, बॅनर्जी आणि इतर अनेकजण सहाय्यक भूमिकेत आहेत. हा चित्रपट १३ मे २०२१ ला रिलीझ होणार होता. पण कोरोनामुळे त्याची रिलीझ डेट वाढवण्यात आली होती. आता हा चित्रपट २९ एप्रिलला येतोय.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post