लाेकप्रिय अभिनेत्री काजोलने अभिनयाच्या जोरावर खूप प्रसिद्धी मिळवली आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. इतर बॉलीवूड सेलिब्रिटींप्रमाणे काजोल देखील तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित प्रत्येक अपडेट चाहत्यांसाेबत शेअर करते. अतिशय उत्तम आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणून काजोलकडे बघितले जाते. काजोल विविध कार्यक्रमामध्ये हजेरी लावताना दिसते.
काजोलचा (Kajol) खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम करून तिची स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. काजोलचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी खूप आतुकतेने वाट पाहत असतात. काजोलचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तसेच काजोल जेव्हा कुठे बाहेर फिरताना दिसते. त्यावेळी पापाराझी तिचे फोटो काढत असतात. एका मुलाखती दरम्यान काजोलने पापाराझी विषयी संताप व्यक्त केला आहे.
काजोल म्हणाली की, ‘मला माहित आहे की, पापाराझींचे काम फोटो क्लिक करणे आणि ते चाहत्यांपर्यंत पोहोचवणे हेच आहे. परंतु या सगळ्यात त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, कलाकारांना देखील प्राइवेसीची गरज असते. त्यांनीही मर्यादेचा आदर केला पाहिजे.’ तिच्या या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
त्याचवेळी तिने दोन पापाराझींनी दुचाकीवरून तिचा पाटलाग केल्याचा एक किस्सा सांगितली आहे. काजोल म्हणाली की, ‘एक दिवस ब्रँडा क्रॉस करत असताना या लोकांनी माझी कार पाहिली. ते माझ्या मागे लागले. त्यावेळी मी कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेली नाही. तरीही या सर्व लोकांनी माझा पाटलाग केला.’
त्यावेळी जर हीच घटना एखाद्या सामान्य व्यक्तीसोबत घडली असती, तर त्याने पोलिसात तक्रार दाखल केली असती. पण मी एक स्टार आहे म्हणून मी बोलू शकत नाही. त्यांना मी विचारू शकत नव्हते की, तुम्ही माझ्या मागे का येत आहात? मी स्टार असल्यामुळे मला त्याची भीती वाटू शकत नाही. मी एक स्टार असल्यामुळे नेहमी माझ्यावर ते पहारा ठेवतात, असे काजोलने सांगितले. (Kajol made a sensational statement about the paparazzi)
अधिक वाचा-
–टॉमेटोच्या किंमतीवर बोलणाऱ्या सुनील शेट्टीवर सदाभाऊ खोत संतापले; म्हणाले, ‘तुमच्यासारख्या भिकाऱ्यांच्या…’
–अंजी आणि पशाचा डान्स व्हिडिओ व्हायरल; पाहा व्हिडिओ