Sunday, June 23, 2024

‘सत्यप्रेम की कथा’मधील कार्तिक-कियाराचा रोमान्स पाहून लोकांना आठवले शाहरुख-काजोल, व्हिडिओ एकदा पाहाच

भूल भुलैया 2‘ नंतर हँडसम हिरो कार्तिक आर्यन आणि प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणीसत्यप्रेम की कथा‘ द्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी परत येत आहेत. अशात हा चित्रपट 29 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. रिलीजला काही दिवस बाकी असताना सोशल मीडियावर या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, कार्तिक आणि कियाराची रॉकिंग केमिस्ट्री दाखविणारा या चित्रपटातील पहिले गाणे समाेर आले आहे, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपटाच्या धमाकेदार टीझरनंतर निर्मात्यांनी चित्रपटातील पहिले गाणे ‘नसीब से’ रिलीज केले आहे, ज्यामध्ये कार्तिक अन् कियाराची रॉकिंग आणि गोड केमिस्ट्री प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे. ‘नसीब से’ गाणे समाेर आल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्याची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. चाहत्यांनी कार्तिक-कियारा यांच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीचे तसेच गाण्याच्या चित्रीकरणाचे कौतुक केले आहे. दुसरीकडे, पहिलं गाणं रिलीज होताच चाहत्यांनी दुसऱ्या गाण्याची मागणीही सुरू केली आहे. त्याचबरोबर या गाण्याने काही लोकांना शाहरुख-काजोलच्या रोमान्सची आठवण करून दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

एका युजरने कमेंट करत लिहिले की, “कार्तिक आणि कियारा यांच्यातील केमिस्ट्री पाहता, हे कपल स्वर्गात बनले आहे असे वाटते.” या चित्रपटाचे दिग्दर्शिन समीर विद्वांस यांनी केली आहे, तर साजिद नाडियाडवाला, शरीन मंत्री आणि किशोर अरोरा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

‘सत्यप्रेम की कथा’ व्यतिरिक्त कार्तिक आर्यनकडे ‘आशिकी 3’ आणि ‘कॅप्टन इंडिया’ सारखे चित्रपट आहेत,  तर दुसरीकडे कियारा अडवाणी ‘गेम चेंजर’ या अॅक्शन चित्रपटात राम चरणसोबत दिसणार आहे.(bollywood actor kartik aaryan kiara advani upcoming film satya prem ki katha song naseeb se out)

हे देखील वाचा