Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड टॉमेटोच्या किंमतीवर बोलणाऱ्या सुनील शेट्टीवर सदाभाऊ खोत संतापले; म्हणाले, ‘तुमच्यासारख्या भिकाऱ्यांच्या…’

टॉमेटोच्या किंमतीवर बोलणाऱ्या सुनील शेट्टीवर सदाभाऊ खोत संतापले; म्हणाले, ‘तुमच्यासारख्या भिकाऱ्यांच्या…’

गेल्या काही दिवसांपासून बाजार भावामध्ये झालेला बदल चांगलाच चर्चेच विषय बनला आहे. गेल्या आठवगड्यात टोमॅटोचे भाव वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ सुरू झाली. तर दुसरीकडे सामान्य नागरीकाच्या खिशाला कात्री लागली. त्यामुळे हा विषय चर्चेत आला आहे. वाढलेल्या टोमॅटोच्या दरावर अभिनेता सुनील शेट्टीने खळबळजणक वक्तव्य केले. त्यावर आता रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी खरपूस टीका केली आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले की, “गेल्या काही दिवसांपासून देशभरात आणि राज्यात टोमॅटोचा प्रश्न धूडघुस घालत आहे. प्रत्येक व्यक्ती टोमॅटोवर बोलता बोलता पागल झाला आहे. या पागलांमध्ये भर पडली ती सिने सृष्टीतील कलाकारांची. कलाकार फार संवेदनशील असतात. परंतु, काही सिने कलाकार हे सडक्या डोक्याचे आहेत. अभिनेता सुनील शेट्टी आर्थिकदृष्ट्या गब्बर सिंग आहे. तरी त्याला टोमॅटो खायला परवडत नाही. अरे शेतकऱ्याची भूमिका साकारायची असेल तर कोट्यवधी रुपये घेता. तोच शेतकरी एका बाजूला आत्महत्या करतोय, कधीतरी 10-12 वर्षांतून चांगला भाव मिळाला की तुमच्यासारख्या जागतिक भिकाऱ्यांच्या पोटात दुखायला लागतंय.”

तसेच ते पुढे म्हणाले की, “अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty ) तुम्ही सिने कलाकार नाही, तुम्ही बाजारू कलावंत आहात. तोजागतिक भिकारी आहे. मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करतो की, हा भिकारी जर तुमच्या दारात आला तर या सडक्या डोक्याच्या माणसाला सडके टोमॅटो द्या.”

दरम्यान, आजकाल टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत आणि त्याचा परिणाम आमच्या स्वयंपाकघरावरही झाला आहे. म्हणूनच आजकाल मी टोमॅटोचा वापर कमी केला आहे. पण टोमॅटोच्या किमती वाढल्याने सामान्य नागरिकांप्रमाणे आम्हालाही त्रास सहन करावा लागत आहे, असे वक्तव्य अभिनेता सुनील शेट्टीने केले होते. (Sadabhau Khot was furious with Sunil Shetty for talking about the price of tomatoes)

अधिक वाचा- 
अंजी आणि पशाचा डान्स व्हिडिओ व्हायरल; पाहा व्हिडिओ
“आमच्या शोमध्ये जास्त चालत नाही” म्हणत ‘या’ दिग्गज विनोद अभिनेत्याने व्यक्त केले पुरुषांनी स्त्री पात्र साकरण्यावर मत

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा