Tuesday, June 18, 2024

असा आहे काजोलच्या नावाचा अनोखा किस्सा, वडिलांना ठेवायचे होते ‘हे’ नाव; एकदा वाचा हा भन्नाट किस्सा

सगळ्या प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यमध्ये काय चालले आहे, याबद्दल जाणून घेण्यात सगळ्यांनाच खूप रस असतो. अगदी काहीजण त्यांची लाईफ स्टाईल देखील कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. या‌ बॉलीवूड स्टारमध्ये समावेश होतो तो म्हणजे काजोलचा. आपल्या अभिनयाने आणि स्टाईलने ती सगळ्यांना तिच्याकडे आकर्षित करत असते.

काजोलचे फॅन फॉलोविंग देखील मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे त्यांना‌ प्रत्येकालाच आयुष्यात काय चालले आहे हे जाणून घेण्याची खूपच उत्सुकता असते. तर आज आम्ही तुम्हाला काजोलच्या आयुष्यातील एक किस्सा जाणार आहोत. काजोलचे वडील काजोलला मर्सडीस या नावाने हाक मारत असत. हो अगदी बरोबर वाचलत तुम्ही मर्सडीज.

ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत असेल की, मर्सडीस या कंपनीच्या मालकाच्या मुलीचे नाव मर्सडीज होते. त्यामुळे त्याने त्याच्या कंपनीचे नाव मर्सिडीज असे ठेवले होते. यामुळे काजोलचे वडील खूप प्रभावित झाले आणि त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव मर्सडीज ठेवायचे हे ठरवले. इतरांना हे नाव आवडले नसल्याने त्यांनी ते नाव बदलले आणि तिचे नाव काजोल (kajol) ठेवले. परंतु बंगाली भाषेमध्ये ‘ओ’ या शब्दाचा उच्चार अधिक प्रमाणात असल्याने तिचे नाव काजल‌‌ ऐवजी काजोल असे झाले. आणि सर्वत्र तिला आज याच नावाने ओळखतात.

काजोलच्या आयुष्यातील हा किस्सा तिच्या खूप कमी चाहत्यांना माहीत असेल. तिने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील तिच्या नावाशी जोडलेला हा किस्सा‌ शेअर केला होता. काजोल मुळत: बंगालची आहे आणि तिचे संपूर्ण नाव काजोल मुखर्जी असे आहे. परंतु काजोल, चित्रपटात तिच्या पूर्ण नावाचा वापर करत नसल्यामुळे तिला सर्वत्र काजोल या नावानेच लोक ओळखतात.

अधिक वाचा- 
अतिशय आलिशान जीवन जगते अभिनेत्री काजोल, कोट्यवधींच्या गाड्या, लाखोंच्या साड्यांचे आहे चांगले कलेक्शन
एकेकाळी ‘या’ हिट चित्रपटांना काजोलने दिला होता नकार, आज नक्कीच होत असेल पश्चाताप

हे देखील वाचा