Saturday, June 15, 2024

कमल हसन यांनी ‘द केरळ स्टोरी’वर साधला जोरदार निशाणा, सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट

शाहरुख खानच्या ‘पठाण चित्रपटानंतर या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा ‘द केरळ स्टाेरी‘ हा चित्रपट हाेय. हा चित्रपट भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वाधिक कमाई करणारा महिला मुख्य चित्रपट ठरला आहे. मात्र, या चित्रपटावरून आतापर्यंत बरेच वाद झाले आहेत. अनेक विरोधी पक्षांनी याला चुकीच्या तथ्यांवर आधारित प्रोपगंडा फिल्म म्हटले आहे. अशात अलीकडेच तमिळ सुपरस्टार कमल हासननेही या चित्रपटावर जोरदार निशाणा साधला आहे. काय म्हणाला अभिनेता? चला, जाणून घेऊया…

कमल हसन (kamal haasan) यांनी मुलाखतीदरम्यान एएनआयला सांगितले की, “मी तुम्हाला सांगितले हाेते की, हा एक प्रोपगंडा चित्रपट आहे, ज्याच्या मी विरोधात आहे. हे पुरेस नाही की, तुम्ही लाेकांबाबत सर्वात शेवटी खरी गाेष्ट सांगणार. ते खरोखर खरे असले पाहिजे आणि ते खरे नाही.”

https://twitter.com/ANI/status/1662415310312570892?s=20

मंडळी, कमल हासन हे त्यांचे मत स्पष्टपणे मांडण्यासाठी ओळखले जातात. कमल हे सिनेसृष्टीत सक्रिय असण्यासाेबत राजकारणातही सतत सक्रिय असतात. गेल्या वर्षी ते ‘विक्रम’ या चित्रपटात दिसले होते. लोकेश कनगराज दिग्दर्शित हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर हिट ठरला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

दुसरीकडे, द केरळ स्टोरीबद्दल बाेलायचे झाले तर, अदा शर्माने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. अशात या चित्रपटातील अदाच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, अदा लवकरच ‘कमांडो 4’मध्ये विद्युत जामवालसोबत अॅक्शन करताना दिसणार आहे, ज्यासाठी अभिनेत्रीचे चाहते तिचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड उत्साही आहे.(tollywood actor kamal haasan slams the kerala story said it is not enough if you write true story just at the bottom as a logo)

हे देखील वाचा