Friday, March 29, 2024

‘आजच्या पिढीला हे काय झालंय?’ तुनिषा शर्माच्या मृत्यूनंतर काम्या पंजाबीने व्यक्त केली खंत

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने अगदी 20 व्या वयातच आपल्या आयुष्याला संपावले. तिच्या आत्महत्यानंतर अनेक लोकांना आणि कलारांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. तिने आपल्या को-स्टार म्हणजेच शीजान खान याच्या मेकअप रुममध्ये जाऊन गळफास लावून आपलं आयुष्य संपवलं. हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते यांचे ब्रेकअप होऊन अगदी 10 दिवसातच अभिनेत्रीने हे टोकाचं आऊल उचललं. या घटनेनंतर तिचा मित्रपरिवार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपले दु:ख व्यक्त करत आहेत. नुकतंच टीव्ही अभिनेत्री पंजाबी हिने देखिल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तुनिषाविषयी आपलं खंत व्यक्त केली आहे. तुनिषाच्या मृत्यूनंतर काम्याचे ट्वीट खूपच चर्चेत आलं आहे.

तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिच्या आत्माहत्यानंतर अनेक कलाकारांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. अनेक चाहत्यांनी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे. नुकंतच टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री काम्या पंजाबी (Kamya Panjabi) ही समाजातील अनेक घडामोडींवर आपले परखड मत मांडत असते तिने देखिल तुनिषाच्या मृत्यूनंतर मत व्यक्त करत ट्वीट शेअर कलेले आहे, ज्यामुळे अभिनेत्री खूपच चर्चेत आली आहे.

काम्या पंजाबी हिने ट्वीट शेअर करत लिहिले की, “आजच्या पिढीला हे काय झालं आहे? तुमच्या समस्यांचा सामना करण्यासाठी थोडी तरी हिम्मत दाखवा. तुम्ही एवढ्या सहजपणे स्वत:चं आयुष्य कसं काय संपवताय, लगेचच हार का मानताय? एवढं टोकाचं पाऊल उलचलण्याआधी आपल्या आई-वडीलांचा एकदा तरी विचार करा. थोडसं महत्व त्यांनाही द्या कारण, जेव्हा तुम्ही असं टोकाचं पाऊल उचलता तेव्हा त्यांना मृत्यूपेक्षा बरंच काही सहन करावं लागतं.”

तुनिषा शर्मा हिने तिचा बॉयफ्रेंड शीजाद खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती खूप डिप्रेशनमध्ये गेली होती आणि त्यामुळे तिने तिचा कोस्टार म्हणजेच शीजान खान याच्या खोलीमध्ये जाऊन गळफास घेतला. त्यामुळे तिचा कथित बॉयफ्रेंड शीजाद खान याला पोलीसांनी 4 दिवसासाठी कस्टडी मागितली आहे. त्याशिवया त्याची कडक चौकशी देखिल सुरु आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
सुशांत सिगं राजपूत आत्महत्या की हत्या? पोस्टमार्टम कर्मचाऱ्याचे खळबळजनक वक्तव्य
जेव्हा सलमान खानला पहिल्यांदा पाहून कियारा आडवाणीची बोलतीच झाली होती बंद, वाचा तो किस्सा

हे देखील वाचा