Friday, February 21, 2025
Home बॉलीवूड कंगना रणौतचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘इंडस्ट्रीमध्ये तुषार कपूरच आहे माझा मोठा समर्थक…’

कंगना रणौतचा मोठा खुलासा; म्हणाली, ‘इंडस्ट्रीमध्ये तुषार कपूरच आहे माझा मोठा समर्थक…’

सध्या ओटीटीवर कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) ‘लॉकअप’ कार्यक्रमाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचाही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमातील अनेक कलाकार सध्या नवनवीन खुलासे करताना पाहायला मिळत आहेत. कंगनाने डिजिटल प्लॅटफॉर्म अल्ट बालाजीला पाच वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि कार्यक्रमाला ३०० दशलक्ष व्ह्यूज पूर्ण झाल्याबद्दल कार्यक्रमामध्ये आनंद साजरा केला. या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्यासाठी एकता कपूर (Ekta Kapoor) तिचा भाऊ तुषार कपूरसोबत (Tusshar Kapoor) शोमध्ये पोहोचली होती. यावेळी कंगणाने तुषार कपूरबद्दल केलेल्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री कंगना रणौत तिच्या बोल्ड आणि बिंनधास्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. प्रत्येक विषयांवर ती आपले मत व्यक्त करत असते. त्यामुळे अनेकदा तिला टीकेलाही सामोरे जावे लागते. अलिकडेच कंगनाच्या ‘लॉकअप’मध्ये एकता कपूर आणि तुषार कपूर त्यांच्या अल्ट बालाजी या ओटीटी फ्लॅटफॉर्मला पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंद साजरा केला. यावेळी अभिनेत्री कंगनाने तुषार कपूरचे कौतुक करताना, तुषार तिचा सर्वात मोठा समर्थक असल्याचे सांगितले आहे. यावेळी तुषार कपूरनेही कार्यक्रमातील स्पर्धकांच्या भेटी घेत मादाम तुसामधील पुतळ्यांची भेट घेतल्यासारखे वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी तुषाार कपूरनेही कंगनाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.

कंगनासोबत बोलताना तुषार म्हणतो, “मी तुझ्याशी बोलायला खूप उत्सुक होतो. तू माझ्या आवडत्या अभिनेत्रींपैकी एक आहेस. तुझे चित्रपट पाहिल्यानंतर मी नेहमीच ट्वीट करत असतो.” यावेळी कंगनाही तुषार कपूरबद्दल बोलताना म्हणते, “इंडस्ट्रीतील लोकांसोबत माझे जेवढे भांडण झाले आहे, त्यामध्ये तुषारनेच मला पहिला पाठिंबा दिला आहे.” यावेळी तुषार कपूरने कार्यक्रमातील कैद्यांसोबत खेळ खेळण्याचा आनंदही लुटला. तसेच त्याने मुनव्वर फारुकीला आपल्या पुस्तकाची प्रत भेट देत, “तू एकमेव सिंगल पिता” म्हणत त्याची खिल्ली उडवल्याचीही पाहायला मिळाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा