बॉलिवूडची धाकड गर्ल म्हणजे कंगना रानौत ही आपल्या रोखठोख वक्तव्यामुळे ओळखली जाते. कोणत्याही गोष्टीवर बेधडक भाष्य करणाऱ्या अभिनेत्रींपैकी ओळखली जाते. मात्र, कधी कधी तिच्या अशा बिंदास्त वक्तव्यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा देखिल सामना करावा लागतो. कंगणाने बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. ती आता राजकारणामध्ये आपले नशीब आजमावत आहे. ती सोशल मीडिवर नेहमी सक्रिय असते. तिच्यासाठी नुकतंच सोशल मीडियाकडून एक आनंदाची बातमी आली आहे.
अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut ) पुन्हा एकदा आपल्या सोसल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे खूपच चर्चेत आली आहे, ज्यामुळे ती खूपच खुश आहे. कारण काही दिवसांपूर्वी अभिनेत्रीचे ट्वीटर अकाउंट काही कारणामुळे बॅन करण्यात आले होते आता मात्र, ट्वीवरने तिचे अकाउंट पुन्हा एकदा सुरु केले आहे. त्यामुळे अभिनेत्री जाम खुश आहे. शनिवार ( दि. 28 ऑक्टोंबर) दिवशी ती ट्वीटरवर परतली. तिने या विषयावर आधीच अंदाज ठोकला होता, पण आता तो अंदाज खरा झाला आहे.
View this post on Instagram
कंगना गेल्या एका वर्षपासून आपरल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन चाहत्यांशी जोडलेली असते. कारण एका वर्षापूर्वीच अभिनेत्रीचा जास्त वाद पेटला होता. त्यामुळे ट्वीटर अकाउंट बॅन करण्यात आले होते,जेव्हा कंगनाला समजले की, ट्वीटरचे प्रमुख आता टेस्ला कंपनीचे प्रमुख एलॉन मस्क सांभाळत आहेत. तर कंगना लगेच इंस्टग्रामद्वारे ट्वीटरवर परतली. तिला आधिच अंदाजा आला होता की, ती लवकरच ट्वीटरवर परतनार आहे. कारण तिने एलॉन मस्कला लाडीगुडी लावून आणि त्यांचे कौतुक करुन शेवटी कंगनाने आपले व्टीटरवर अकाउंट सुरु करुन घेतलेच. त्यामुळे तिची भविष्यवाणी खरी ठरली, त्यामुळे अभिनेत्री इंस्टग्रामवर स्टोरी शेअर करत आपल्या भनिष्यवानीवर खुपच खुश होती.

तिने आपल्या भविष्यवाणीचे कौतुक करत स्टोरी शेअर करत असताना लिहिले की, “मी त्याच गोष्टीची भविष्यवाणी करते ज्या लवकरच होणार असतात… काही लोक माझ्या दृष्टीकोणाला एक्स-रे म्हणतात, काही त्याला श्राप म्हणतात, तर काही याला जादू टोना म्हणतात. किती दिवस आपण अशा स्त्री प्रतिभेला नाकारत राहणार… भविष्य सांगणे सोपे नाही. यासाठी मानवी प्रवृत्तीची उल्लेखनीय ओळख आणि व्याख्या तसेच निरीक्षण कौशल्य आवश्यक आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या आवडी-निवडीचा त्याग करावा लागतो, जेणेकरून आपल्याला ज्या विषयाचा अभ्यास करायचा आहे त्याचा अभ्यास करता येईल.”
तिने लिहिलेल्या नोटवरुन लगेच समजत आहे की, ती आपलं ट्वीटर अकाउंट सुरु झाल्यामुळे खूपच खुश आहे आणि तिने ट्वीटर बंद झाल्याच्या कारणावरही स्टोरी शेअर करत टोमणे मारले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘लग्न झाल्यावर गोष्टी बदलतात म्हणूनच आम्ही…’, म्हणत पुलकितने केले त्याच्या आणि कृतीच्या लग्नावर भाष्य
कॅटरिना कैफने उघड केले तिचे टाेपण नाव; म्हणाली, सासऱ्यांनी दिले हे अनाेखे नाव










