Friday, July 5, 2024

अती घाई संकटात जाई! इमरजेंसी चित्रपटाच्या सेटवर कंगनाचा घरला पाय अन्…

बॉलिवूडची धाकड गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रनौत ही सतत चर्चेत असते. ती आपल्या सडेतोड वक्तव्यामुळे चाहत्यांचे लक्ष वेधत असते. मात्र, सध्या ती आपल्या आगामी येणारा ‘इमरजेंसी‘ चित्रपटाच्या तयारासाठी जोरदार चर्चेत आली आहे. अभिनेत्री सध्या चित्रपटाच्या शुटिंगसाठी लोकेशन शोधण्यामध्ये खूपच व्यस्त दिसत आहे. तिने नुकतंच सोशल मीडियावर आउटिंगचे फोटो शेअर केले असून तुफान व्हायरल होत आहे.

अभिनेत्री कंगना रनौत ( Kangana Ranaut) ही चाहत्यांचे लक्ष वेधण्याची एकही संधी सोडत नाही. सध्या ती आपल्या वक्तव्यामुळे नाही, तर आगामी येणाऱ्या चित्रपटामुळे लोकांच्या नजरेत येत आहे. अभिनेत्री नुकतंच ‘इमरजेंसी’ चित्रपटाच्या शुटिंगसाठी जागा शोदण्यामध्ये व्यस्त आहे, त्यामुळे अभिनेत्री अनेक ठिकाणी जाऊन जागेचा शोध घेत आहे, तेवहा तिने आपले आऊटींगचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत भन्नाट कॅप्शन दिले आहे.

 

View this post on Instagram

 

कंगणानाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “टेक-रेकी, इमरजेंसी नोव्हेंबर/2022” या फोटोंमध्ये कंगनाने हिरव्या रंगाचा जॅकिट आणि फिकट रंगाची पॅन्ट घातली होती. अभिनेत्रीने निसर्गाचा आनंद लुटत एका मोठ्या दगडावरून दुसर्या दगडावर जात असताना दिसून येत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये एका मोठ्या दगडापशी ऊभा राहून फोटो काढला आहे. यानंतर एका अन्य फोटोमध्ये कंगना लाल रंगाच्या ट्रेक सूटमध्ये दिसली.

 

View this post on Instagram

 

अभिनेत्रीने एका फोटोसोबत त्यामागची गोष्ट देखिल सांगितली तिने लिहिले की, “जेव्हा तुम्ही खूप उत्तेजित होतात तेव्हा असे होते.”  या फोटोमध्ये कंगणा धडपडताना दिसली असून तिचा पाय घसरला होता त्यामुळे तिने त्या फोटोला अनुसरुन हे कॅप्शन दिले. दुसर्‍या फोटोमध्ये, अभिनेत्री तिच्या टीम सदस्यांचे वर्णन ‘सेट सैनिक’ करत पाहाला मिळाली. हे फोटो पाहूण चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने लिहिले की, “हा फोटो आसाच्या कांजीरंगा नॅशन पार्कचा आहे.” अजून एकाने लिहिले की, “कार्बी आंगलोनमध्ये आल्याबद्दल तुमचे स्वागत आहे, आमच्या जागेवर येण्यासाठी तुमचे खूप खूप आभार मॅडम.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

आगामी येणारा चित्रपट इमरजेंसी यामध्ये कंगना इंदिरागांधीच्या भूमिकेत दिसणार आहे त्यासोबतच यामध्ये अनुपम खेर (Aupam Kher) ,श्रेयस तळपदे (Shreyas Talpade), महिमा चौधरी (Mahima Chaudhari), विशाक नायर (Vishak Nayar), सतिश कौशिक (Satish kaushik) आणि मिलिंद सोमण (Milind Soman) सारखे अभिनेता मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.  कंगनाचा हा पहिला चित्रपट आहे, जो सोलो डायरेक्शनमध्ये बनत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कलाकारांना कला सादर करण्यासाठी पुण्यात सुरू झाले हक्काचे व्यासपीठ, प्रशांत दामलेंच्या हस्ते उद्धाटन
विराट कोहली जेव्हा अनुष्का शर्मासाठी सार्वजनिक ठिकाणी पोहोचला होता बेकरीत, तेव्हा घडलं असं काही

हे देखील वाचा