Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

सिद्धार्थ, कियारा यांना शुभेच्छा देताना बॉलिवूडवर पुन्हा एकदा कंगनाने साधला निशाणा

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी लगीनगाठ बांधली. राजस्थानच्या जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये त्यानी धुमधडाक्यात लग्न केले. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली. त्यांच्या लगांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बॉलिवूडसोबतच फॅन्स देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. यात बॉलिवूडची पंगा क्वीन असलेल्या कंगना रणौतचा देखील समावेश होता.

जेव्हा कियारा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, तेव्हा एकाने त्यांच्या फोटोवर कमेंट करत विचारले की, “ते एकमेकांना डेट करत होते?” त्या नेटकाऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना कंगनाने लिहिले, “हो ते डेट करत होते. मात्र ते कोणत्याही चित्रपट किंवा ब्रँड प्रमोशनसाठी नाही, जसे बॉलिवूडमध्ये लोकं करतात. त्यांनी कधीच लाइमलाइट मिळवण्यासाठी किंवा लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी असे काही केले नाही. त्यांचे प्रेम खरे होते आणि त्यांची खरंच खूप छान जोडी आहे. ” याआधी देखील कंगनाने सिद्धार्थ आणि कियारा यांचे कौतुक केले होते.

तत्पूर्वी कियारा आणि सिद्धार्थ यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो ‘आता आमची कायमस्वरूपाची बुकिंग झाली.” असे म्हणत पोस्ट केले होते. त्यांचे लग्न २०२३ वर्षातील सर्वात जास्त गाजलेले आणि चर्चेत असलेले लग्न ठरले. सिद्धार्थ आणि कियारा यांनी कधीच मीडियासमोर सार्वजनिक ठिकाणी त्यांचे नाते स्वीकारले नाही. मात्र मीडियाला त्यांच्या नात्याची आणि लग्नाची कुणकुण होतीच. कियारा आणि सिद्धार्थ यांनी शेरशहा या सिनेमात एकत्र काम केले होते. मात्र त्याची ओळख आधीपासूनच होती. या सिनेमांतरच त्यांच्या नात्याची चर्चा जास्त प्रमाणात मीडियामध्ये होऊ लागली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नाना पाटेकर यांनी आतंकवाद्यची भूमिका आहे म्हणून बॉडी ऑफ लाइज हॉलीवूडपटाला दिला होता झटक्यात नकार

बिग बींना बेल बाॅटम घालने पडले महागात, एक उंदीर त्यांच्या पॅटंमध्ये घुसला अन्…

हे देखील वाचा