बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असते. अशाच तिच्या एका विधानामुळे, तिला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. हा खुलासा खुद्द कंगनाने सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे केला आहे. तिने मुंबई हल्ल्यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती, तेव्हापासून तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र, कंगनाने अशा लोकांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. यासोबतच तिने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना धमकी देणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत ती तिची बहीण आणि आईसोबत सुवर्ण मंदिरात दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना स्मरण करून मी लिहिले होते की, देशद्रोह्यांना कधीही माफ करू नका किंवा विसरु नका. या प्रकारात देशाच्या अंतर्गत गद्दारांचा हात आहे. कधी पैशाच्या लालसेने तर कधी पदाच्या लालसेपोटी भारतमातेला कलंकित करण्याची एकही संधी देशद्रोह्यांनी सोडली नाही.” (kangana ranaut registered an fir against those threats to her and requested sonia gandhi)
मिळतायेत जीवे मारण्याच्या धमक्या
पुढे अभिनेत्रीने लिहिले, “माझ्या या पोस्टवर मला विघटनकारी शक्तींकडून सतत धमक्या येत आहेत. भटिंडा येथील एकाने मला जीवे मारण्याची उघड धमकी दिली आहे. मी अशा कोल्ह्यांना किंवा धमक्यांना घाबरत नाही. देशाविरुद्ध कट रचणाऱ्यांविरुद्ध आणि दहशतवादी शक्तींविरुद्ध मी बोलते आणि नेहमी बोलत राहीन. निष्पाप सैनिकांची हत्या करणारे नक्षलवादी असोत, टोळ्या असोत किंवा ऐंशीच्या दशकात पंजाबमधील गुरुंच्या पवित्र भूमीचे तुकडे करून खलिस्तान बनवण्याचे स्वप्न पाहणारे परदेशात बसलेले दहशतवादी असोत.”
‘लोकशाही आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद’
आपल्या पोस्टमध्ये कंगना रणौत पुढे म्हणतेय की, “लोकशाही ही आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे, सरकार कोणत्याही पक्षाचे असो, परंतु नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे आणि विचारांच्या अभिव्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचे रक्षण, एकात्मता, एकता आणि मुलभूत अधिकार दिले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आम्हाला दिले आहे. मी कधीही कोणत्याही जात, धर्म किंवा गटाबद्दल अपमानास्पद किंवा द्वेष पसरवणारे काहीही बोलले नाही.”
सोनिया गांधींना करून दिली ‘या’ गोष्टीची आठवण
कंगना म्हणतेय की, “मी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनाही आठवण करून देऊ इच्छिते, की तुम्ही सुद्धा एक स्त्री आहात. तुमच्या सासू इंदिरा गांधी यांनी या दहशतवादाविरुद्ध शेवटपर्यंत लढा दिला. कृपया तुमच्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना अशा दहशतवादी, विघटनकारी आणि देशविरोधी शक्तींकडून येणाऱ्या धमक्यांवर त्वरित कारवाई करण्याची सूचना द्या. या धमक्यांविरोधात मी पोलिसात एफआयआर दाखल केली आहे. मला आशा आहे की पंजाब सरकारही लवकरच कारवाई करेल.”
कंगना रणौतची ही पोस्ट आता चांगलीच चर्चेत आली आहे. अनेक युजर्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकता की, काहीजण अभिनेत्रीला पाठिंबा देत आहेत, तर काहीजण तिच्या विरोधात बोलत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जसप्रीत बुमराहसोबत जोडलं जायचं राशी खन्नाचं नाव, तर आज ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री
-पर्यटकांसाठी अडचण बनले कॅटरिना कैफ अन् विकी कौशलचे लग्न? ‘अशी’ झालीय रणथंबोरमध्ये परिस्थिती