Monday, October 14, 2024
Home बॉलीवूड कंगना रणौतची ‘ती’ पोस्ट पाहून चाहते पडले गोंधळात, लावले जातायत वेगवेगळे अंदाज

कंगना रणौतची ‘ती’ पोस्ट पाहून चाहते पडले गोंधळात, लावले जातायत वेगवेगळे अंदाज

कंगना रणौत ही बॉलिवूडची एक टॅलेंटड अभिनेत्री आहे. तिच्या अभिनयाने ती नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकत असते. अनेकवेळा ती असे काही वक्तव्य करते की, ज्यामुळे तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. सोशल मीडियावर देखील ती चांगलीच चर्चेत असते. ती नेहमीच अनेक मुद्यांवर तिचे मत मांडताना दिसते. अशातच कंगनाने केलेली एक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. जी सर्वत्र व्हायरल होत आहे.

कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक कपल स्केच शेअर केले आहे. ज्यात दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. हे शेअर करून तिने लिहिले आहे की, “तेरे लिये हम है जिये, कितने सितम हम पर सनम.” (Kangana Ranaut romantic post about love fans get confuse) या नंतर कंगनाने एक लहानपणीचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले आहे की, “मी एक साधारण मुलगी आहे. माझ्यात काही खास नाही. शिवाय यावर मी विश्वास ठेवते. त्यामुळेच मी या सुंदर जगात आले आहे.”

Photo Courtesy Instagramkanganaranaut

कंगनाची पोस्ट तिच्या चाहत्यांना संभ्रमित करत आहे. तिने आधी केलेल्या पोस्ट वाचून सगळ्यांना असे वाटत आहे की, ती प्रेमातील दुःखाचा सामना करत आहे. दुसरी पोस्ट वाचून असे वाटत आहे की, ती आयुष्य एन्जॉय करत आहे. त्यामुळे तिचे चाहते वेगवेगळे अंदाज लावत आहेत.

कंगना रणौतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच तिच्या ‘धाकड’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती अर्जुन राजपालसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सोबतच ती ‘थलायवी’ आणि ‘तेजस’, मणीकर्णिका रिटर्न्स : द लेजेंड ऑफ जिद्दा’, ‘टिकू वेड्स शिरू’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. ती एक अभिनेत्रीसोबत निर्माती देखील आहे. तिने तिच्या प्रोडक्शनच्या बॅनरखाली ‘टिकू वेड्स शेरू’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. साई कबीर हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा