Tuesday, June 18, 2024

Kangana Ranut | पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांना कंगना रणौतचा मोलाचा सल्ला, अभिनेत्रीनेही सांगितला आपला अनुभव

Kangana Ranut | सध्या देशात निवडणुकीचे वातावरण आहे. लोकांना त्यांच्या मतदानाच्या हक्काची जाणीव करून दिली जात आहे. अशातच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांसाठी ‘माझे पहिले मत देशासाठी’ हे अभियान सुरू केले आहे. अ

भिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranut )तिच्या नुकत्याच सोशल मीडिया पोस्टमध्ये या मोहिमेचा उल्लेख केला आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांनाही प्रोत्साहन दिले.

कंगना रणौत तिच्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखली जाते. ती प्रत्येक गोष्टीवर मोकळेपणाने बोलत असते. हा गुण तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्येही स्पष्टपणे दिसून येतो. आज इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करताना कंगनाने पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांना एक संदेश दिला आहे. तिने आपला पहिला मतदानाचा अनुभवही चाहत्यांसोबत शेअर केला आहे. कंगनाने लिहिले आहे, ‘उठ आणि चमक, पहिल्यांदाच मतदार, हा क्षण तुमचा आहे’!

कंगना रणौत पुढे लिहिते, ‘मला अगदी स्पष्टपणे आठवते, जेव्हा मी पहिल्यांदा मतदान केले होते. मी खूप उत्साहात होते आणि त्याच उत्साहाने मीवाट पाहत रांगेत उभा होते. यानंतर मतदानासाठी दालनात प्रवेश केला. हा माझ्यासाठी खूप रोमांचक अनुभव होता. तो एक आश्चर्यकारक क्षण होता. यासोबत कंगनाने हॅशटॅगमध्ये ‘माझे पहिले मत देशासाठी आहे’ असे लिहिले आहे.

कंगनाने मतदार नोंदणी पोर्टलची लिंकही शेअर केली आहे. अभिनेत्रीच्या या पोस्टवर यूजर्स कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘सनातनी शेरनी! तुमचे शब्द नेहमीच शक्तिशाली असतात. दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘तुझ्या प्रत्येक चाहत्याला तुझा अभिमान आहे’. आणखी एका यूजरने लिहिले की, ‘जय हिंद जय भारत, तुमचे शब्द आठवतील’.

कंगनाच्या कामाबद्दल सांगायचे तर, ‘इमर्जन्सी’ हा तिचा आगामी लोकप्रिय चित्रपट आहे. या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. हा चित्रपट या वर्षी जूनमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. कंगनाने या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Animal On OTT | OTT वर ‘ऍनिमलने’ मोडले रेकॉर्डस्, 11.7 दशलक्ष व्ह्यूजसह डंकी-सालारला टाकले मागे
स्ट्रोकमधून बरे झाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती गेले सुट्टीवर, सुनेने केला फ्लाईटमधील फोटो शेअर

हे देखील वाचा