Monday, June 24, 2024

स्ट्रोकमधून बरे झाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती गेले सुट्टीवर, सुनेने केला फ्लाईटमधील फोटो शेअर

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांना १० फेब्रुवारी रोजी स्ट्रोकमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 12 फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यांची प्रकृती बरी झाली आहे आणि ते सुट्टीसाठी बाहेर गेले आहेत. मिथुन यांचा मुलगा मिमोह आणि सून मदालसासोबत सुट्टीसाठी गेले आहेत.

मिथुन यांची सून आणि अभिनेत्री मदालसा शर्मा हिने त्यांची झलक दाखवली आहे. त्याने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मिथुन आणि मदालसा फ्लाइटमध्ये बसलेले दिसत आहेत. फोटोमध्ये मिथुन यांनी काळा चष्मा आणि मास्क घातलेला आणि हातात फोन घेतलेला दिसत आहे. ट्यंनै डोक्यावर टोपीही घातली असून शालही पांघरलेली आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये मदालसाने लिहिले- कौटुंबिक प्रेम”

मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत आता ठीक आहे. मिथुन यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर अभिनेते म्हणाले होते, ” मी पूर्णपणे ठीक आहे. काहीच अडचण नाही. मला माझ्या खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि लवकरच काम सुरू करू शकेल. याशिवाय पीएम मोदींनी मिथुन चक्रवर्ती यांना फोन करून त्यांची तब्येतही विचारली होती. मिथुन चक्रवर्ती प्रकृतीची काळजी घेत नसल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांना फटकारले होते.”

मिथुन यांची सून मदालसाविषयी सांगायचे तर ती सध्या अनुपमा या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये दिसत आहे. या शोमध्ये ती काव्याच्या भूमिकेत आहे. याआधी ती शोमध्ये ग्रे कॅरेक्टरमध्ये होती, पण आता ती पॉझिटिव्ह रोलमध्ये आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

डान्समुळे ट्रोल करणाऱ्यांना दीपिका सिंगने दिले सडेतोड उत्तर; म्हणाली, ‘मला काहीही फरक पडत नाही..’
दोन वर्षांपासून इमरान हाश्मी खातोय एकच पदार्थ; म्हणाली, ‘वैतागून बायको सोडून नाही गेली तर बरं’

हे देखील वाचा