×

कंगना रणौतच्या शोमध्ये आला मोठा ट्विस्ट, जेलर करण कुंद्राला करणार ‘ही’ अभिनेत्री रिप्लेस

कंगना रणौतचा लॉकउप शो सध्या तुफान गाजत आहे. या शोमध्ये होणारे विविध धक्कादायक खुलासे, कलाकारांची भांडणं, टास्क आदी अनेक गोष्टी शोला प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनवत आहे. लवकरच या शोचा ग्रँड फिनाले संपन्न होणार आहे, त्याआधीच शोमध्ये एक मोठे वळण येणार असल्याचे सांगितले जात आहे. या शोमध्ये जेलरच्या भूमिकेत अभिनेता करण कुंद्रा दिसत असून, लवकरच तो हा शो सोडणार असल्याचे समजत आहे. हो जर असे झाले तर करण कुंद्राची जेलरची जागा कोण भरून काढणार हा प्रश्न तुम्हाला पडला असेल चला तर जाणून घेऊया याबद्दल.

करण कुंद्राने हा सो सोडल्यानंतर त्याच्या जेलरच्या जागी अभिनेत्री शेहनाज गिलची वर्णी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. बिग बॉसमुळे संपूर्ण जगात तूफान प्रसिद्ध झालेली शेहनाज आता एका नव्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. लॉकअप या शोचे मेकर्स खूप आधीपासूनच शेहनाजला या शोमध्ये घेऊ इच्छित होते, मात्र तिच्या व्यस्त वेळापत्रकामुळे तिच्याकडे या शोसाठी वेळच नव्हता. मात्र आता लवकरच शेहनाज या शोमध्ये दिसणार या बातमीमुळे तिचे फॅन्स खूपच खुश झाले आहे.

प्राप्त माहिती प्रमाणे अभिनेत्री कंगना रणौतने शेहनाजला सांगितल्यानंतर तिने हा शो करण्यासाठी हामी भरली आहे. करण सध्या त्याच्या इतर प्रोजेकॅक्ट्समध्ये खूपच बिझी असून, तो या शोसाठी इच्छा असूनही वेळ काढू शकत नाही. एका माहितीनुसार तो डान्स दिवाने जूनियरचे सूत्रसंचालन करत आहे, त्यामुळे या शोला वेळ देऊ शकत नाही. म्हणूनच करणला आता शेहनाज रिप्लेस करणार असल्याचे सांगितले जात आहे.

कंगन रणौतचा लॉकअप शो सध्याच्या घडीचा तुफान लोकप्रिय शो आहे. नुकतेच या शोच्या जजमेंट डे च्या भागाने ६ मिलिनियन व्ह्यूज मिळवत रेकॉर्ड केले आहे. शोमध्ये टिकण्यासाठी स्पर्धकांना त्यांच्या आयुष्यातील कटू सत्य सर्वांसमोर सांगावे लागते. हेच या शोचे मोठे आणि लक्षवेधी वैशिष्ट्य आहे. या शोच्या माध्यमातून अनेक कलाकारांबद्दल मोठे आणि धक्कादायक असे सत्य आतापर्यंत समोर आले आहे.

हेही वाचा-

Latest Post