अभिनेत्री कंगना राणौत हिला बाॅलिवूडची ‘पंगा क्विन’ म्हणून ओळखले जाते. कंगना बोलली आणि वाद झाला नाही असे फार कमी वेळा होते. कंगना सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनकेदा कंगना सोशल मीडियावर तिचे मत कोणाला ही न घाबरता मांडत असते. त्यामुळे तिला ट्रोल करण्यात येत. कंगना सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. सध्या कंगना एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर आणि सिनेसृष्टीत सक्रिय असणारी कंगना (Kangana Ranaut) आता राजकारणात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. आता खरच कंगना राजकारणात प्रवेश करणार का? असा प्रश्न सर्वांन समोर उपस्थित झाला आहे. अलिकडेच तिने नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. आता कंगनाने 2024 ची लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत आपली प्रतिक्रिया मांडली आहे. अभिनेत्री राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या झाल्यानंतर तिने अफवा फेटाळल्या आहेत.
नुकतेच, कंगना राणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, “माझे नातेवाईक आणि मित्र मला हे पाठवत आहेत. त्यांना वाटत आहे की, हे हेडलाईन मी दिली आहे. परंतु ही हेडलाइन आणि बातमी माझ्याकडून देण्यात आलेली नाही.”
या पोस्टनंतर, कंगना राणौतच्या राजकीय प्रवेशावर पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की, कंगना राणौत प्रत्यक्षात राजकारणात प्रवेश करणार नाही. तर, काही लोकांचा असा विश्वास आहे की, ती नक्कीच राजकारणात प्रवेश करेल, परंतु तिच्या राजकीय पक्षाचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत गेल्या काही वर्षांपासून तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. ती सोशल मीडियावरही अतिशय सक्रिय असते आणि तिचे राजकीय मतंही तिने अनेकदा व्यक्त केली आहेत. त्यामुळे, तिच्या राजकीय प्रवेशाच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. ती एक बेधडक आणि स्पष्टवक्ते अभिनेत्री आहे. तिला राजकारणाची चांगली माहिती आहे. (Kangana Ranaut will enter the field of elections as soon as the flop films are lined up)
आधिक वाचा-
–‘अॅनिमल’च्या वादळात उडून गेला ‘सॅम बहादुर’, चांगले रिव्ह्यू मिळूनही केली फक्त ‘एवढी’ कमाई
–ही दोस्ती तुटायची नाय! कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हरची जोडी पुन्हा एकत्र; व्हिडिओ शेअर करत केली घोषणा