Monday, December 9, 2024
Home बॉलीवूड अर्पिता-आयुषच्या ईद पार्टीत गेली होती कंगना राणौत; लोक म्हणाले, ‘ज्यांना ती शिव्या देत होती…’

अर्पिता-आयुषच्या ईद पार्टीत गेली होती कंगना राणौत; लोक म्हणाले, ‘ज्यांना ती शिव्या देत होती…’

बॉलीवूडची पंगा क्वीन कंगना राणौत तिच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अलीकडेच प्रियांका चोप्रा हिने जेव्हा बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये जाण्याच्या निर्णयावर वक्तव्य केले होते, तेव्हा कंगना रणौतने उघडपणे करण जोहरवर निशाणा साधला होता. अशात आता अलीकडेच सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांनी ईद पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी बॉलीवूडशी संबंधित सर्व स्टार्स त्यांच्या घरी हजर होते. या पार्टीत कंगना रणौतही दिसली होती, ज्यानंतर चाहत्यांनी कंगनावर जोरदार टीका केली. काय आहे नेमके प्रकरण? चला जाणून घेऊया…

अर्पिता खानच्या घरी झालेल्या ईद पार्टीला स्टार्सनी हजेरी लावली होती. एकापाठोपाठ एक स्टार्स रेड कार्पेटवर दिसले. यावेळी बॉबी देओल, हेलन, सुशीला चरक, संगीता बिजलानी, कॅटरिना कैफ, आमिर खान, तब्बू आदी स्टार्स दिसले. यानंतर जेव्हा कंगना राणौतची गाडी थांबली तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यादरम्यान कंगनाने मस्टर्ड कलरचा अनारकली सूट घातला होता, ज्यामध्ये अभिनेत्री सुंदर दिसत हाेती.

कंगना रणौत गेल्या वर्षी ईदच्या कार्यक्रमासाठी अर्पिता खानच्या घरी दिसली होती. मागच्या वेळेप्रमाणे यावेळीही सोशल मीडियावर लोकांनी कंगनावर जोरदार टीका केली. युजर्सनी कंगनाला तिच्या स्वतःच्या जुन्या विधानाची आठवण करून दिली, ज्यामध्ये कंगनाने सलमान खानवर निशाणा साधला. एका व्यक्तीने कमेंटमध्ये लिहिले की, “ती रोज खानांबद्दल उलटसुलट बोलते, आता ती पार्टीत कशी गेली.” तर दुसऱ्या युजरने लिहिले, “ज्यांना तुम्ही रोज शिव्या देता, त्यांच्याच ईद पार्टीत सहभागी होण्यासाठी आले आहात.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

त्याचबरोबर काही लोकांनी सलमानबाबत कंगनाचे समर्थनही केले. काही लोकांनी सांगितले की, कंगनाने नेहमीच सलमानला पाठिंबा दिला आहे. कंगनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर कंगनाशेवटची ‘धाकड’मध्ये दिसली होती. मात्र, अभिनेत्रीचा हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. अशात आता कंगना लवकरच ‘इमर्जन्सी’मध्ये दिसणार आहे.

अर्पिता खानच्या ईद पार्टीबद्दल बाेलायचे झाले तर, या पार्टीत क्रिकेटर एमएस धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा देखील पोहोचल्या हाेत्या. यासाेबतच कॅटरिना कैफची बहीण इसाबेल, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खान, एमसी स्टॅन, रितेश, जेनेलिया, सिद्धार्थ निगम, हिमेश रेशमिया, पूजा हेगडे, दिशा पटनी, पलक तिवारी, मनीष मल्होत्रा, पुलकित यांसारख्या स्टार्सने उपस्थिती लावली.(bollywood actress kangana ranaut reached arpita khan eid party users trolled for her old statement on salman khan)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अर्पिता शर्माच्या ईद पार्टीत धोनीची पत्नी अन् लेक झिवाची राॅयल एन्ट्री, साक्षीच्या लूकने चाहत्यांना पाडली भूरळ

जेव्हा शाहरुख खान मनोज वाजपेयीला पहिल्यांदा घेऊन गेला होता डिस्कोमध्ये; शेअर करायचे सिगारेट अन् बिडी

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा