सोनी टीव्हीवर प्रसारित होणारा ‘द कपिल शर्मा शो’ हा एक लोकप्रिय कॉमेडी शो आहे. या शोला फक्त देशातच नव्हे, तर जगभरात पाहणे पसंत करतात. शोमध्ये कलाकार परफॉर्म करतात आणि चाहत्यांचे मनोरंजन करतात. पण या शोच्या एका एपिसोडसाठी कलाकार किती पैसे घेतात, हे तुम्हाला माहिती आहे का? चला पाहूया कपिल शर्मा शोच्या कास्टची कमाई किती आहे.
कपिल शर्मा
शोचा होस्ट आणि लोकप्रिय मालिकेमधून आपल्या विनोदाद्वारे सर्वांना हसवणारा कपिल शर्मा आज देशाचा ‘कॉमेडी किंग’ बनला आहे. मग आता किंगची कमाईही भक्कम असेल. या शोसाठी कपिलला आतापर्यंत प्रति एपिसोड 30 लाख ते 35 लाख रूपये मिळत होते. पण येत्या सिझनमध्ये कपिलने फी वाढविली आहे. अहवालानुसार, त्याला प्रत्येक एपिसोडसाठी 50 लाख रुपये मिळतील.
अर्चना पूरन सिंग
जर कपिल शर्मा सध्याचा ‘कॉमेडी किंग’ असेल, तर अर्चना पूरन सिंग ‘कॉमेडी क्वीन’ आहे, यात काही शंका नाही. ती शोमध्ये सर्वात मोठ्या पोस्टवर आहे. अर्चनाही अधेमधे विनोद करून प्रेक्षकांना हसवते. तिला प्रत्येक एपिसोडसाठी 10 लाख रुपये दिले जातात.
कृष्णा अभिषेक
आपल्या कॉमेडीने आणि अपोझिट जेंडरच्या भूमिका साकारून कृष्णाने बरेच नाव कमावले आहे. त्याने जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या सुपरस्टारची नक्कलही केली आहे. कृष्णाला प्रत्येक भागासाठी 10 ते 12 लाख रुपये मिळतात, जी एक मोठी रक्कम आहे.
किकू शारदा
किकू शारदा बऱ्याच दिवसांपासून प्रेक्षकांना हसवण्याचे काम करत आहे. या शोमध्ये काम करण्यासाठी त्याला 5 लाख रुपये मिळतात. तो शो मध्ये सर्वात क्रिएटिव्ह पात्रांमध्ये दिसतो. त्याने बच्चा यादव, बंपर यांसह अनेक पात्रे साकारली आहेत.
भारती सिंग
कॉमेडीच्या जगात भारती सिंग हे एक खूप मोठे नाव आहे. ती प्रत्येक शोसाठी 10 ते 12 लाख रुपये घेते. ती तिलती यादव आणि कम्मो बुवाच्या भूमिकेत दिसली आहे.
चंदन प्रभाकर
शोमध्ये चहा विकून सर्वांना हसवण्याचा टॅलेंट जर कोणामध्ये असेल, तर तो फक्त चंदूचे पात्र साकारणाऱ्या चंदन प्रभाकरमध्येच आहे. स्वतःचा अनादर करुन टाळ्यांची लूट करणारा चंदू सर्वांचा आवडता आहे. त्याला प्रत्येक एपिसोडसाठी 7 लाख रुपये मिळतात.
सुमोना चक्रवर्ती
सुमोना चक्रवर्ती ही अशी व्यक्ती आहे, जिची कपिल शर्मा सर्वात जास्त थट्टा करतो.
या कारणास्तव फेमिनिझम विचारधारेच्या लोकांनी बर्याच वेळा शोला ट्रोल केले आहे. तिला या शोसाठी प्रति एपिसोड 6 ते 7 लाख मिळतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-