Wednesday, July 3, 2024

जेव्हा कपिल शर्मा त्याच्याच विद्यार्थिनीवर करत होता प्रेम, तेव्हा अशी फुलली प्रेमकथा

काही प्रेमकथा एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशाच असतात. कपिल शर्मा आणि गिन्नी यांची प्रेमकहाणीही सारखीच आहे. कपिल शर्माने नुकतेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. नेटफ्लिक्सवर त्याचा कपिल शर्मा हा कार्यक्रम ‘आय अम नॉट डन येट’ 28 जानेवारी रोजी रिलीज झाला. कपिल शर्माने या कार्यक्रमात खुलासा केला की त्याला त्याच्या आयुष्यातील प्रेम कसे मिळाले. 2018 मध्ये कपिल शर्मा (kapil Sharma) आणि गिन्नी (Ginni) या दोघांनी लग्नगाठ बांधली. कपिल शर्माने त्याची प्रेमकहाणी अतिशय रंजक पद्धतीने सांगितली आहे.

कपिल शर्मा हा हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि कॉमेडीयन म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या खास विनोदी शैलीत तो कार्यक्रमात प्रत्येकाला पोट भरून हसायला लावत असतो. त्याच्या कार्यक्रमात येणार्‍या प्रत्येकाला तो अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत असतो. आज (2 एप्रिल) कपिल शर्मा चा वाढदिवस. याच निमित्ताने कपिल शर्माच्या गोड प्रेम प्रकरणाची कथा जाणून घेऊ या. आपल्या प्रेमाची एक मजेदार झलक दाखवत कपिल शर्मा म्हणाला, “गिन्नी जालंधरच्या गर्ल्स कॉलेजमध्ये होती आणि माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी लहान होती. मी त्यावेळी माझा पीजी डिप्लोमा इन कमर्शियल आर्ट्स करत होतो. खिशात पैसेही हवे होते.

“त्यामुळे मी नेहमी थिएटरमध्ये भाग घ्यायचो. इतर कॉलेजमध्येही जायचो. गिन्नी माझी विद्यार्थिनी होती जी खूप मेहनती होती. ती हिस्ट्रिओनिक्स आणि स्क्रिप्टमध्ये खूप चांगली होती. म्हणूनच मी तिला माझा सहाय्यक बनवले. इतकंच नाही तर ती एका सधन कुटुंबातील होती. मला चांगलं आठवतं ती रोज महागड्या गाडीतून कॉलेजला यायची. मी स्कूटर चालवत असे. ति माझ्या प्रेमात पडली. पण आमच्या वर्गातील फरकामुळे मला नेहमीच शंका होती की काहीही होऊ शकते.”

कपिलने पुढे सांगितले की,”त्याच्या एका मित्राने त्याला सांगितले की गिन्नीला तो आवडतो. मात्र मी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. कारण मी आणि गिन्नी कधीही एकत्र राहू शकतील असे मला वाटले नव्हते. पण देव खूप दयाळू आहे, आणि मी भाग्यवान आहे की मी तिच्याशी लग्न केले. तिने मला नेहमीच खूप साथ दिली. मला आठवतं, जेव्हा मी एका कठीण टप्प्यातून जात होतो, अडचणीत होतो तेव्हा मला माझ्या पत्नीने साथ दिली त्यामुळेच मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. ” दरम्यान कपिल शर्मा आणि गिन्नी आता एका मुलाचे पालकही बनले आहेत.
(kapil sharma ginni chatrath love story)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हाेणाऱ्या जावायासाेबत बाेनी कपूर यांनी दिली पाेज? एकदा ‘ताे’ व्हिडिओ पाहाच

वात्सल्य, परंपरा, शिस्त गुंफत आले! अभिनेत्री राधिका देशपांडेने ‘त्या’ पोस्टमधून व्यक्त केली मायलेकीच्या नात्याची वीण

हे देखील वाचा