×

‘माझी लेडी लाफिंग बुद्धा’, म्हणत कपिल शर्माने अर्चना पुरण सिंगसाठी लिहिली खास पोस्ट

मनोरंजनविश्वातील विनोदवीर म्हणून ओळखला जाणारा कपिल शर्मा त्याच्या विनोदासाठी आणि त्याच्या शोसाठी तुफान गाजत असतो. कपिल शर्माने त्याच्या विनोदाच्या जोरावर अमाप नावलौकिक मिळवला. कपिल शर्मा जेवढा त्याच्या शोमुळे गाजतो तेवढाच तो त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील गाजत असतो.

कपिल शर्माने नुकतीच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामुळे सध्या कपिल शर्मा चांगलाच गाजत आहे. कपिल शर्माने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अर्चना पुरण सिंगसोबतचे ‘द कपिल शर्मा शो’च्या सेटवरचे दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये अर्चना कपिलचे कान ओढताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती कपिलला गालावर किस करताना दिसत आहे. कपिलने या फोटोसोबत एक सुंदर कॅप्शन देखील दिले आहे.

View this post on Instagram

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कपिलने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “माझी लेडी लाफिंग बुद्धा, लव्ह यु अर्चना पुरण सिंगजी. आम्हा सर्वाना प्रोत्साहित करण्यासाठी तुमचे खूप आभार. कहसकरून आमच्या वाह्यात विनोदांची. तुमच्याबद्दल नेहमीच खूप सन्मान आणि प्रेम.” फॅन्सला या दोघांची बॉंडिंग आणि फोटो खूपच आवडत असून, कपिलची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. कपिलच्या या पोस्टवर अर्चना यांनी देखील कमेंट्स केली आहे.

अर्चना पुरण सिंगने कपिलच्या पोस्टवर रिप्लाय करत लिहिले, “ऑ…..तू मला हसवतो. तू मला रडवतो आणि या सर्वांचे एक कारण आहे कपिल, कोणतेतरी जुने नाते असेल. जे या जन्मात २००७ पासून आजपर्यंत कायम आहे. तुला माहित नाही, माझे तुझ्यावर किती प्रेम आहे कदाचित असेलही. म्हणूनच तू माझ्यासोबत कायम पंगा घेत असतो. तुझ्या उत्तम आरोग्यासाठी आणि आनंदासाठी खूप प्रार्थना. खूप प्रेम.”

View this post on Instagram

A post shared by Archana Puran Singh (@archanapuransingh)

कपिल शर्मा आणि अर्चना पुरण सिंग यांचे नाते खूपच वेगळे आणि अनोखे आहे. त्यांच्यात नेहमीच शोदरम्यान नोकझोक होत असते. कपिल नेहमीच अर्चनावर विनोद करत असतो, ती देखील अतिशय उत्तम पद्धतीने ते घेत एन्जॉय देखील करते. अर्चना आणि कपिल यांचे नाते कॉमेडी सर्कस पासून सुरु झाले आहे. या शोमध्ये कपिल स्पर्धक तर अर्चना परीक्षक होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post