Tuesday, June 10, 2025
Home टेलिव्हिजन अर्रर्र! असं काय घडलं की, झलकच्या मंचावर करणच्या डाेळ्यात तरळले अश्रू?

अर्रर्र! असं काय घडलं की, झलकच्या मंचावर करणच्या डाेळ्यात तरळले अश्रू?

झलक दिखला जा 10‘ या डान्स रिऍलिटी शोची विजेता गुंजन सिन्हा ठरली आहे. जिने आपल्या धमाकेदार स्टाईलने केवळ प्रेक्षकांचीच नाही, तर जजचीही मने जिंकली. गुंजनसह, इतर स्पर्धकांनीही शोच्या ग्रँड फिनालेमध्ये धमाकेदार परफॉर्मन्स दिला आणि सर्वांचे खूप मनोरंजन केले. करण जोहर देखील या शोच्या जजपैकी एक होता, जाे शाे दरम्यान भावूक झाला.

झलक दिखला जा 10च्या (jhalak dikhla jaa 10) ग्रँड फिनालेमध्ये ट्रिब्यूट दिलेला पाहून करण जोहर (karan johar) खूप भावूक झाला. यादरम्यान, एक व्हिडिओ क्लिप शेअर करण्यात आली, ज्यामध्ये करणचा लहानपणापासून आतापर्यंतचा प्रवास अतिशय खास पद्धतीने दाखवण्यात आला हाेता. या व्हिडिओमध्ये करणसोबत त्याचे आई-वडील आणि मुलांचाही समावेश होता. यात आणखी एक खास गोष्ट होती ती म्हणजे त्यांचे चित्रपट.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

व्हिडिओच्या बॅकग्राउंडला सांगितल्या जात आहे की, करणने कशाप्रकारे वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी बॉलिवूडला ‘कुछ कुछ होता है’ हा ऑलटाइम फेव्हरेट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिला आणि स्वत:ला सिद्ध केले. यानंतर, करणने ‘कभी खुशी कभी गम’, ‘माय नेम इज खान’ आणि ‘ए दिल है मुश्कील’ यासारखी सुपरहिट चित्रपट बाॅलिवूडला दिली.

हा व्हिडिओ पाहून करण खूप भावूक झाला. कारण, या व्हिडिओमध्ये करणच्या आयुष्यातील खास माणसांचा समावेश हाेता. करणने बॉलिवूडच्या जवळपास प्रत्येक सुपरस्टारसोबत काम केले आहे. मग तो सलमान खान असाे, शाहरुख खान असाे किंवा रणबीर कपूर इतकेच नाही, तर करणने बाॅलिवूडच्या लाेकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट, काजोल, राणी मुखर्जी यांच्यासाेबतही काम केले आहे.( karan johar gets emotional after makers pay tribute to him on jhalak dikhla jaa 10 set)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रेमासमाेर नतमस्तक! ‘या’ स्टार्सनी लग्नासाठी चक्क धर्मच टाकला बदलून, पाहा यादी

‘मी नऊ वर्षांची होते तेव्हा…’, लग्नाआधी शारीरिक संबंधांवर सेलिब्रिटींनी केला धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा