Saturday, June 29, 2024

‘पैसे कमी घे आणि ऍक्टिंग जास्त कर! करण जोहरने वरुण धवनला शुभेच्छा दिल्या का मारले टोमणे!

वरुण धवन (Varun Dhawan) हा हिंदी चित्रपट जगतातील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्याने हिंदी सिनेसृष्टीत चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. त्याच्या अभिनयाचे आणि चित्रपटांचे नेहमीच कौतुक होत असते. रविवार (२४ एप्रिल) वरुण धवन आपला वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या चाहत्यांसह अनेक दिग्गज कलाकारांनीही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरनेही (Karan Johar) वरुणला खास पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काय आहे ही व्हायरल पोस्ट चला जाणून घेऊ. 

करण जोहरने वरुण धवनला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. करण जोहरने इंस्टाग्रामवर वरुणसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोला करणने, “चला थोडी प्रसिद्धी मिळवुया आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया! वाढदिवसाच्या शुभेच्छा वरुण उर्फ ​​कुकू! जुगजुग जिओ, तुम जिओ हजारो साल, बॉक्स ऑफिसवर कर धमाल, पैसे कमी घ्या, नाहीतर गरीब निर्मात्याला कधी फायदा होईल.” असे मजेशीर कॅप्शन दिले आहे.

‘जुग जुग जिओ’ हा वरुण धवनचा आगामी चित्रपट आहे. राज मेहता दिग्दर्शित या चित्रपटात वरुण धवन, कियारा अडवाणी (Kiara Advani), अनिल कपूर (Anil Kapoor), नीतू कपूर (Neetu Kapoor), प्राजक्ता कोळी (Prajakta Koli) आणि मनीष पॉल (Manish Paul) यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत तयार होत आहे.

त्याच्या वाढदिवशी वरुण धवनने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, “या वाढदिवसाला काम करताना मला खूप आनंद होत आहे. मागील २ वाढदिवस मी घरीच होतो, पण यावेळी पहाटे ५.३० वाजता उठलो. बवालच्या सेटवर लवकर उठून नितेश तिवारीला रिपोर्ट करण्यात खूप आनंद झाला.” या वर्षी त्याचे ‘जुग जुग जिओ’ आणि ‘भेडिया’ रिलीझ होणार आहेत. अशी माहितीही वरुणने त्याच्या पोस्टमध्ये सांगितली आहे. वरुण धवन सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘बवाल’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. वरुण लखनऊमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. नुकतेच लखनौमधील शूटिंगचे अनेक फोटो समोर आले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा