Thursday, April 18, 2024

वयाच्या १८ व्या वर्षी विल स्मिथ बनला करोडपती, करण जोहरच्या चित्रपटातही दिसला होता अभिनेता

चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा पुरस्कार ऑस्कर सोहळा लॉस एंजेलिस येथे पार पडला. या सोहळ्याला जगातील सर्व प्रसिद्ध चित्रपट दिग्गजांनी हजेरी लावली होती. ९४ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले. या दरम्यान विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा अकादमी पुरस्कार मिळाला आहे. परंतू, तुम्हाला माहित आहे का की, विल स्मिथने अगदी लहान वयात काम करायला सुरुवात केली आणि किशोरवयातच तो करोडपती बनला. चला तर मग जाणून घेऊया की, विल स्मिथ त्याच्या किशोरवयात इतका हिट कसा ठरला.

फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया येथे २५ सप्टेंबर १९६८ रोजी जन्मलेल्या विल स्मिथला (Will Smith) सुरुवातीपासून अभ्यासात फारसे काही वाटत नव्हते. त्यामुळेच त्याने आपला अभ्यास थांबवला आणि वयाच्या १२ व्या वर्षापासून रॅप गाणे सुरू केले. काही काळानंतर स्मिथची भेट जेफ्री ॲलन टाउन्सला झाली आणि दोघे चांगले मित्र बनले. या दोघांनी १९८६ मध्ये त्यांचे पहिले गाणे ‘गर्ल्स इनट नथिंग’ प्रदर्शित केले जे खूप हिट झाले.

यानंतर १९८७ मध्ये, वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी स्मिथने ‘रॉक द हाउस’ नावाचा अल्बम लॉन्च केला. स्मिथचा अल्बम इतका हिट झाला की, तो रातोरात करोडपती झाला. यानंतर त्याने अनेक हिट गाणी गायली. लहान वयात एवढे नाव कमावल्यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले. छोट्या पडद्यावर हळूहळू रोल केल्यानंतर स्मिथला मोठ्या पडद्यावरही ऑफर्स मिळू लागल्या.

विल स्मिथने १९९५ मध्ये बिग बजेट चित्रपट ‘बॅड बॉईज’ केला होता. हा चित्रपटही प्रचंड गाजला. २००१ मध्ये अली बायोपिकसाठी स्मिथला अकादमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यानंतर २००६ मध्ये स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या श्रेणीसाठी पुन्हा नामांकन मिळाले. तेव्हापासून स्मिथच्या कारकिर्दीला पंख लागले आहेत. अकादमी पुरस्कारासाठी दोनदा नामांकित झाल्यानंतर स्मिथने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले.

सध्या विल स्मिथ हा हॉलिवूडचा प्रसिद्ध सुपरस्टार आहे. एवढेच नाही, तर त्याने बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ या चित्रपटातही काम केले आहे. या चित्रपटात त्यांची भूमिका अतिशय छोटी असून, चित्रपटातील एका गाण्यात तो काही मिनिटांसाठीच दिसला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा