सुहाना खानने फोटो शेअर करत फ्लॉन्ट केली त्वचा लिहिले, “डू नॉट…”


बॉलिवूडच्या स्टार किड्सच्या बाबतीत बॉलिवूडमध्ये अनेक किड्स नेहमीच प्रकाशझोतात असतात. या सर्वांमध्ये शाहरुख खानची लेक सुहाना खान नेहमीच नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय असते. सुहाना अजून बॉलिवूडमध्ये आली नसली तरी तिची फॅन फॉलोविंग तुफान आहे. एखाद्या मोठ्या कलाकाराला देखील मागे टाकेल इतके फॅन फॉलोविंग तिला इंस्टाग्रामवर असून, ती सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करताना दिसते. नुकतेच सुहाना खानने तिचा नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला तिचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सुहानाने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तिची मुलायम, चमकदार आणि बेदाग त्वचा पाहायला मिळत आहे. सुहानाने तिचे दोन फोटो शेअर केले असून, या फोटोंना कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ‘डू नॉट डिस्टर्ब’ अर्थात ‘अडथळा आणू नका’ लिहिले आहे. बऱ्याच दिवसांनी सुहानाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टला अनेकजण लाईक्स आणि कमेंट करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या पोस्टवर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हार्ट इमोजी शेअर करत त्यावर कमेंट केली आहे.

काही दिवसांपूर्वीच सुहानाने जाहीर केले की, ती लवकरच न्यूयॉर्क सोडणार आहे. तिने न्यूयॉर्क विद्यापीठातून चित्रपट निर्मितीमध्ये पदवी संपादन केली असून, आता ती पुन्हा भारतात परतणार असल्याने तिने न्यूयॉर्क सोडत असल्यामुळे दुःख व्यक्त करत एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोवर लिहिले होते की, “काळजी करु नका. जरी तुम्ही न्यूयॉर्क सोडून जात असला तरी तुम्ही कायम न्यूयॉर्कचे नागरिकच असाल’ हा फोटो शेअर करत तिने एक इमोजी वापरला होता. त्यानंतर सोशल मीडियावर सुहानाची ही पोस्ट देखील व्हायरल झाली होती.

हेही वाचा :

बेगानी शादी मैं ‘मिका’ दिवाना, न बोलवताच लग्नात पोहचले मिका आणि राहुल, त्यांना बघून उडाला कल्ला

‘ही दोस्ती तुटायची नाय’, विकासने दिल्या विशालला भावी आयुष्याच्या शुभेच्छा

टेलिव्हिजन अभिनेत्री पूजा बॅनर्जींचे डोहाळे जेवण झाले संपन्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल 


Latest Post

error: Content is protected !!