Sunday, April 14, 2024

करण जोहरच्या कुटुंबातील ‘या’ व्यक्तीने केलं होतं 5 वेळा लग्न; जाणून घ्या त्या व्यक्तीबद्दल

चित्रपटसृष्टीत जोहर कुटूंबीयांची खास ओळख आहे. करण जोहरचे वडील यश जोहर हे दिग्गज चित्रपट निर्माता आहेत. यानंतर करणनेही वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत चित्रपट निर्मितीचा मार्ग निवडला आहे. तो बॉलिवूडचा चमकणारा स्टार बनला आहे. करण जोहरचे काका इंद्रजित सिंग जोहर (IS जोहर) हे देखील खूप प्रतिभावान कलाकार होते. चित्रपट सृष्टीतील बादशाह असण्यासोबतच, आय.एस. जोहर यांनी अनेक शैलींमध्ये प्रभुत्व मिळवले होते.

आय.एस. जोहर(IS Johar) त्यांच्या कारकिर्दीपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहीले. आय.एस. जोहर यांनी आयुष्यात 5 वेळा लग्न केले आहे. एवढेच नाही तर आय.एस. जोहर यांनी आपल्या पाचही पत्नींना घटस्फोटही दिला होता. विचित्र स्वभावाचा माणूस असलेल्या आय.एस. जोहरचं आयुष्यही खूप रंजक होतं. सामाजिक जाणीव असलेले आय.एस. जोहर यांना चित्रपटांमध्ये जितकी आवड होती. तितकीच त्यांनी राजकारणावरही करडी नजर ठेवली.

आय.एस .जोहर यांनी पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांनाही चित्रपटांमध्ये नायिका बनण्याची ऑफर दिली होती. आय.एस. जोहर यांना भारताचा चार्ली चॅप्लिन असेही संबोधले जात होते. त्यांना स्वतःचे नाव अजिबात आवडत नव्हते. त्यांचा जन्म 1920मध्ये झेलम जिल्ह्यात झाला होता. वयाच्या 27व्या वर्षापर्यंत ते झेलममध्येच राहित होते. म्हणजेच पाकिस्थानमध्ये राहत होते. 1947मध्ये जेव्हा देशाच्या फाळणीची चर्चा होत होती, तेव्हा आय.एस. जोहर एका लग्नात सहभागी होण्यासाठी पटियाला आले होते. त्या काळात दंगल झाली आणि ते कधीच पाकिस्तानात जाऊ शकला नाही.

जालंधरमध्ये वर्ष घालवल्यानंतर आय.एस. जोहर मुंबईत पोहोचले. मुंबईत आल्यानंतर आय.एस. जोहरला खूप संघर्ष करावा लागला. त्यांनी प्रथम चित्रपटांसाठी कथा लिहिल्या. यानंतर हळूहळू चित्रपट निर्मात्यांशी संपर्क वाढला. तेव्हा त्यांनी 12 चित्रपट दिग्दर्शित केले आणि चार चित्रपटांची निर्मिती केली. जोहरला एक जुळा भाऊ देखील होता. जो हुबेहुब त्याच्यासारखाच होता. भावाच्या अफेअरमुळे आय.एस. जोहरला एकदा तुरुंगात जावे लागले होते. आय. एस. जोहरच्या भावावर गुन्हा करण्यात आला होता. त्यावेळी त्यांना पोलिसांनी पकडून तुरुंगात टाकले. इतकत नाही तर आय. एस. जोहर यांनी त्यांच्या भावाच्या प्रियसीशी लग्न देखील केल होत.  (Karan Johar’s uncle IS Johar was married 5 times)

अधिक वाचा-
लई भारी! अभिनयाचे शहेनशहा 32 वर्षांनी एकत्र येणार, ‘या’ चित्रपटात झळकणार सुपरस्टार अमिताभ आणि रजनीकांत
आहा कडकच ना! गुलाबी रंगाची साडी नेसून कियारा अडवाणीने केले चाहत्यांना घायाळ 

हे देखील वाचा