Sunday, December 3, 2023

लई भारी! अभिनयाचे शहेनशहा 32 वर्षांनी एकत्र येणार, ‘या’ चित्रपटात झळकणार सुपरस्टार अमिताभ आणि रजनीकांत

सिनेसृष्टीतील दोन दिग्गज नायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेते रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. लवकरच बॉलिवूड आणि टॉलिवूड चे हे दोन्ही सुपरस्टार आपल्याला एकाच फ्रेममध्ये दिसणार आहे. तब्बल 32 वर्षांनंतर बिग बी आणि थलायवा एकत्र येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांनी ‘हम’, ‘अंधा कानून’ आणि ‘गिरफ्तार’सारख्या चित्रपटांमध्ये याआधीही एकसोबत काम केले आहे. त्यामुळे आता दोघांचेही चाहते दोघांना सोबत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. हे दोघे दिग्गज अभिनेते 32 वर्षांनी स्क्रीन शेयर करताना दिसणार आहेत. ( Rajinikanth to reunite with Amitabh Bachchan after 32 years for Thalaivar 170 )

प्राप्त माहितीनुसार, ‘थलाइवर 170’ हा रजनीकांतचा 170 वा चित्रपट असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाचे नाव ‘थलाइवर 170’ ठेवण्यात आले आहे. ‘थलाइवर 170’ या चित्रपटामध्ये बॉलीवूड मधील महानायक अभिनेता अमिताभ बच्चन हे महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत. अमिताभ बच्चन आधी ‘पोन्नियिन सेल्वन’ या सिनेमातील चियान विक्रम यांना या चित्रपटासाठी विचारणा झाली होती. पण आता या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि रजनीकांत दिसणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे.

‘थलाइवर 170’ या चित्रपटाच्या शूटिंग ला लवकरच सुरुवात होणार आहे. या चित्रपटामध्ये टॉलिवूड अभिनेता सूर्याचीदेखील झलक दिसणार आहे, असे बोलले जात आहे.

अधिक वाचा –
– अभिनेता ते राजकीय नेता ‘असा’ आहे नंदामुरी बालकृष्ण यांचा जीवनप्रवास; एकदा वाचाच
– ‘त्याने मला जीवे मारण्याची सुपारी… ‘; ‘या’ अभिनेत्याने केले अक्षय कुमारवर गंभीर आरोप

हे देखील वाचा