सोशल मीडियावर व्हायरल होतोय करीना- तैमूरचा एक गोड फोटो; पाहून हरपेल तुमचेही भान


बॉलिवूडमधील कलाकार नेहमी त्यांच्या चित्रपटांमुळे मीडियामध्ये चर्चेचा विषय असतात. त्यांचे सिनेमे, त्यांचा अभिनय, त्यांचे लूक्स, त्यांचे वैयक्तिक आयुष्य अशा अनेक गोष्टींवर सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगताना आपण पाहिले असेल. मात्र मागच्या काही काळापासून कलाकारांसोबतच त्यांच्या मुलांच्या चर्चा देखील खूप होताना आपण पाहत असतो. स्टारकिड्स हा जणू सर्वांसाठीच अगदी जिव्हाळ्याचा विषय असल्याचे जाणवते.

आजच्या घडीला बॉलिवूडमध्ये लहान मोठे असे अनेक स्टारस किड्स आहेत. मात्र या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रकाशझोतात राहणारा आणि सर्वांचे लक्ष वेधणारा असा एक कीड आहे, तो म्हणजे करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा मोठा मुलगा तैमूर. तैमूरच्या जन्माच्या काही तासांतच त्याचा पहिला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तेव्हापासून ते आजतागायत तैमूर मीडिया सेन्सेशन आहे. अनेकदा तैमूरला विविध ठिकाणी पाहिले जाते, त्याचे भरपूर फोटो व्हायरल होतात. तैमूरची लोकप्रियता दिवसेंगणिक वाढतानाच दिसते. आज जरी करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला असला, तरी अजूनही लोकांमध्ये तैमूरची असणारी क्रेझ तशीच आहे.

तैमूर बऱ्याचदा त्याच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे चर्चेत येतो. आता देखील तैमूर त्याच्या एका फोटोमुळे पुन्हा मीडियामध्ये आला आहे. नुकताच त्याचा आणि करीन कपूरचा एक सुंदर फोटो तैमूरच्या इंस्टाग्रामवरील फॅनक्लबने पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये आई आणि मुलाचे जिव्हाळ्याचे आणि भावनिक नाते स्पष्ट दिसत आहे. करीना आणि तैमूरचा हा फोटो खूपच जवळून घेतला असून, यात तैमूर पांघरून गुंडाळून बसला आहे. तर करीनाने त्याला तिच्या मिठीत घेतले आहे. फोटो पाहून असे वाटते आहे की, ते कुठल्या हिल्स स्टेशनवर असावे. हा जुना फोटो असला तरी आता व्हायरल होत आहे. हा फोटो पोस्ट करताना तैमूरच्या फॅनक्लबने लिहिले की, ‘हॅलो मित्रांनो तुमचा दिवस शुभ असो, सुरक्षित राहा आणि मास्क घाला.’

या दोघांचा हा फोटो पाहून फॅन्स तर भरूभुरून कमेंट्स करत आहे. एकाने लिहिले, ‘खूपच सुंदर फोटो बेबो’. दुसऱ्याने लिहिले, ‘दोघं खूपच गोड दिसत आहे’. अजून एकाने लिहिले, ‘आई आणि मुलाचे प्रेम’. युजर्सच्या या कमेंट्सवरून लक्षात येते की, हा फोटो किती व्हायरल होत आहे आणि युजर्सना आवडत आहे. तैमूरचा जन्म डिसेंबर २०१६ ला झाला होता. काही महिन्यांपूर्वीच करीना दुसऱ्यांदा आई बनली आहे. तिने एका मुलाला जन्म दिला आहे. मात्र या मुलाला करीना आणि सैफने अजूनही लाईमलाईटपासून लांब ठेवले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एवढी नकारात्मकता आणता तरी कुठून?’ ‘सिडनाझ’बाबत पसरलेल्या बातम्यांवर सिद्धार्थचे उत्तर

-शिल्पा शेट्टी बराचद्या सापडलीय वादाच्या भोवऱ्यात; अंडरवर्ल्ड कनेक्शनचा होता आरोप, तर बोल्ड फोटोशूटमुळेही होती ती चर्चेत

-‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाच्या लाईन प्रोड्युसरने नैराश्यामुळे केली आत्महत्या; अनुपम खेर यांनी पोस्टद्वारे दिली माहिती


Leave A Reply

Your email address will not be published.