Tuesday, April 23, 2024

करीना कपूर खान ‘क्रू’साठी खूप उत्साहित; म्हणाली, ‘मला नेहमीच तब्बूसोबत काम करायचे होते’

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनन स्टारर ‘क्रू’ हा चित्रपट सध्या सतत चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला, त्यानंतर लोकांची याविषयीची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात तिन्ही अभिनेत्री एअर होस्टेसच्या भूमिकेत आहेत, ज्या कोहिनूर नावाच्या एअरलाइनसाठी काम करतात. अशातच अभिनेत्री करीनाने तब्बूसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

करीना कपूर म्हणाली की, तब्बूसोबत काम करण्याची तिची इच्छा क्रूसोबत पूर्ण होत आहे. यामुळे ती खूप आनंदी आहेत. अभिनेत्री म्हणाली, “तब्बूसोबत पहिल्यांदाच काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूप उत्साहित आहे. लोलोने (करिश्मा कपूर) तीच्यासोबत अनेकदा काम केले आहे. अखेर मला तीच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली.”

बेबो पुढे म्हणाली, ती क्रिती सेननसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी खूप उत्सुक होती. तिने अभिनेत्रीला खूप गोंडस आणि प्रतिभावान म्हटले. करीना म्हणाली, “मला आशा आहे की हा चित्रपट चांगला बिसनेस करेल. राजेशने खूप मजेदार चित्रपट बनवला आहे त्यामुळे मी खूप उत्साही आणि आनंदी आहे.”

त्याचवेळी क्रिती सेनन म्हणाली, “महिला सहकलाकारांसोबत काम करणे तिच्यासाठी नवीन आणि चांगले होते. आपल्याला बहुतेक पुरुषांसोबत काम करावे लागते. खूप प्रतिभावान महिलांसोबत काम करणं माझ्यासाठी खूप ताजेतवाने होतं आणि ज्यांची मी वर्षानुवर्षे प्रशंसा केली.”

‘क्रू’मध्ये तब्बू, करीना कपूर खान आणि क्रिती सेनॉन यांच्याशिवाय दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश कृष्णन यांनी केले आहे. त्याच वेळी, एकता कपूर, शोभा कपूर, अनिल कपूर आणि रिया कपूर यांनी त्याची निर्मिती केली आहे. 29 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर रिलीज होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सिद्धू मुसेवालच्या आईने दिला मुलाला जन्म, सोशल मीडियावर वडिलांनी शेअर केला फोटो
श्रीदेवीची आठवण काढत बोनी कपूर भावूक; म्हणाले, ‘वाईट काळात माझी पत्नी माझ्यासोबत उभी राहिली’

हे देखील वाचा