करीना कपूर खान सध्या पती सैफ अली खानसोबत मालदीवमध्ये सुट्ट्यांची मजा घेत आहे. सैफ अली खानचा वाढदिवस खास साजरा करण्यासाठी, ते दोघे त्यांच्या दोन्ही मुलांसोबत सुट्टीवर गेले आहेत. याच वर्षी फेब्रुवारीमध्ये बेबो दुसऱ्यांदा आई झाली. तिने जेहला जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, दोन्ही प्रेग्नेंसी दरम्यान अभिनेत्री खूप सक्रिय होती. करीना अनेक महिलांसाठी एक उदाहरण आणि प्रेरणा आहे. लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे, जेहच्या वेळी ती आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाचे शूटिंग करत होती.
करीना कपूर खानने अलीकडेच सांगितले, की तिचा मुलगा जेह देखील आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात आहे. एनडीटीव्हीशी बोलताना करीनाने सांगितले की, तिने तिच्या प्रेग्नेंसीच्या पाचव्या महिन्यात चित्रपटाचे महत्त्वाचे वेळापत्रक पूर्ण केले आहे. तसेच आमिर खानसोबत रोमँटिक सिक्वेन्स देखील शूट केला.
यावेळी करीनाला विचारले गेले की तिला प्रेग्नेंसी दरम्यान कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला? यावर अभिनेत्री म्हणाली, की “मी शूटिंगसाठी पतौडीहून दिल्लीला येत असे. या दरम्यान, मी सैफला खास माझ्याबरोबर राहण्याची विनंती केली होती. कारण तैमूरही माझ्याबरोबर होता आणि त्याला अस्वस्थ वाटू नये अशी माझी इच्छा होती. मी दररोज कारमध्ये दीड तास प्रवास करायचे आणि आम्ही बहुतेक रात्री उशिरापर्यंत शूट केले आहे.” (kareena kapoor khan says son jeh is part of romantic song with aamir khan in laal singh chaddha)
करीनाने सांगितले, की “जेह देखील त्या रोमँटिक गाण्याचा एक भाग होता, जो मी आमिर खानसोबत चित्रपटासाठी शूट केला होता. तर माझा मुलगा व्यावहारिकपणे ‘लालसिंग चड्ढा’मध्ये आहे.
आमिर-करीना कपूरचा हा चित्रपट टॉम हँक्सच्या ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटावर आधारित आहे. हा या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. करीना कपूर खान आणि आमिरची जोडी याआधीही पडद्यावर दिसली आहे. करीना कपूरचे चाहते बऱ्याच काळापासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भारीच ना! स्वांतत्र्यदिनानिमित्त अभिनेत्री असिनने केला लाडक्या मुलीचा फोटो शेअर; एकदा पाहाच