बहीण करिश्माला करीनाकडून वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा! म्हणाली, ‘तू माझी मैत्रीण, माझी आई…’


बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील अत्यंत सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर. ती शुक्रवारी (25 जून) तिचा 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकार आणि चाहते तिला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. यातच तिची बहिणी आणि अभिनेत्री करीना कपूर खान हीने देखील तिला शुभेच्छा दिल्या आहेत. (Kareena Kapoor Khan share Birthday celebration photo of karisma kapoor)

करीना कपूरने सोशल मीडियावर करिश्मा कपूरच्या वाढदिवसाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये करिश्मा कपूर केक कापताना दिसत आहे. यामध्ये सैफ अली खान, अमृता अरोरासोबत त्यांच्या परिवारातील अनेक व्यक्ती दिसत आहेत. करीना कपूरने हा फोटो शेअर करून लिहिले आहे की, “हॅप्पी बर्थडे टू द सेंटर ऑफ आर युनिवर्स.” हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

करीना कपूरने सोशल मीडियावर जे फोटो शेअर केले आहेत, त्यात ते रात्री केक कापताना दिसत आहे. एकीकडे करीनाने फोटो शेअर केले आहेत, तर दुसरीकडे अमृतानेदेखील सोशल मीडियावर सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. या सोबतच तिने करिश्मा कपूरसाठी एक कॅप्शन देखील लिहिले आहे.

याआधी देखील करीनाने एक पोस्ट शेअर केली होती. त्यात देखील तिने करिश्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिने एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये त्या दोघींचे लहानपणापासून ते आतापर्यंत अनेक फोटो होते. हा व्हिडिओ पाहून समजते की, दोन बहिणींमध्ये किती प्रेम आहे.

करीनाने हा व्हिडिओ शेअर करून लिहिले होते की, “सर्वात धाडशी, सर्वात मजबूत आणि सर्वात जास्त मौल्यवान स्त्रीला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. माझी बहीण ही खूप चांगली मैत्रीण, माझी दुसरी आई आणि आमच्या कुटुंबाचे केंद्रस्थान आहे. चायनीज खायला तेव्हा खूप आवडायचे, जेव्हा आम्ही ते दोघी एकत्र खायचो. मी तुझ्यावर जेवढं प्रेम करते, तेवढं इतर कोणीच करत नाही. कधी कधी मला आश्चर्य वाटत की, मोठी बहीण नक्की कोण आहे? पण हे असं होणं चांगल आहे. माझी लोलो.”

करिश्मा कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘प्रेम कैदी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘राजा हिंदुस्तानी’, ‘दिल तो पागल है’, ‘कुली नंबर 1’, ‘हम साथ साथ है’, ‘जीत’, ‘अनारी’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फ्लॉप ऍक्टर ठरूनही रॉयल जीवन जगतोय अभिनेता आफताब; तर वयाच्या ३८व्या वर्षी दुसऱ्यांदा अडकला लग्नगाठीत

-केरळ हायकोर्टाकडून चित्रपट निर्माती आयशा सुल्तानाला अटकपूर्व जामीन मंजूर; भाजप नेत्याविरुद्ध केले होते वक्तव्य

-कपूर घराण्याचे नियम तोडत करिश्माने केले होते अभिनयात पदार्पण; वाचा अभिनेत्रीबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी


Leave A Reply

Your email address will not be published.