‘हा’ पुरस्कार प्राप्त चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आला प्रेक्षकांच्या भेटीला, मिळतोय भरभरून प्रतिसाद


ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. अशातच एक नवीन चित्रपट ओटिटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. तो चित्रपट म्हणजे ‘कारखानीसांची वारी’ होय. अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये गाजलेला असा हा पुरस्कार प्राप्त चित्रपट आहे. हा चित्रपट आता प्रेक्षकांना सोनी लिव्ह ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्यास मिळणार आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित केला गेला आहे. या चित्रपटाची कथा एका कुटुंबावर आधारित आहे. या चित्रपटाची कहाणी एका संयुक्त कुटुंबाच्या अवतीभोवती  फिरते. कुटुंबातील मतभेद, अनपेक्षित, कुटुंब प्रमुखाची जबाबदारी या सगळ्या गोष्टी या चित्रपटात दाखवल्या आहेत. हा चित्रपट उत्‍कट भावनांना दाखवतो, ज्‍या सामान्‍यत: आपण आपल्‍या कुटुंबियांबद्दल व्यक्त करण्यास घाबरतो.

पुण्यात कारखानीस नावाचे एक कुटुंब राहते असते. अचानक या कुटुंब प्रमुखाचे निधन होते. त्यानंतर त्यांची भावंडे आणि मुलांमध्ये त्यांच्या शेवटाची इच्छेनुसार त्यांच्या अस्थीविसर्जन घटनापूर्ण प्रवास सुरू होतो. हा चित्रपट नात्यांची ओळख करून देणारा चित्रपट आहे. चित्रपट वारशामध्ये मिळालेल्या सांस्कृतिक मुलांबाबत प्रश्न तयार होतो. (Karkhanisanchi wari movie release in sony liv ott platform)

प्रतिष्ठित ३३ व्‍या टोकियो इंटरनॅशनल फिल्‍म फेस्टिवलमध्‍ये या चित्रपटाचे वर्ल्‍ड प्रिमियर सादर करण्‍यात आले आणि आंतरराष्‍ट्रीय चित्रपट समीक्षक मॅथ्यू हार्नोन यांनी या चित्रपटाची सर्वोत्तम ५ चित्रपटांपैकी एक म्‍हणून प्रशंसा केली.

‘कारखानीसांची वारी’ चित्रपटामध्‍ये अमेय वाघ, मृण्‍मयी देशपांडे, मोहन अगाशे, गीतांजली कुलकर्णी, प्रदीप जोशी, वंदना गुप्‍ते, शुभांगी गोखले आणि अजित अभ्‍यंकर असे प्रतिभावान कलाकार आहेत. चित्रपटाची निर्मिती अर्चना बोरहडे यांच्या नाइन आर्चर्स पिक्‍चर कंपनीने केली असून सह-निर्मिती एबीपी स्‍टुडिओजने केली आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!