फिसकटलं वाटतं? कार्तिक-जान्हवीच्या नात्यातील दुराव्याबद्दल ‘या’ कारणाने चर्चांना आलं उधाण


अनेक दिवसांपासून अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर सतत चर्चेत आहे. जेव्हापासून या दोघांना एकत्र गोव्यात स्पॉट केले गेले तेव्हापासून या दोघांच्या अफेयरच्या चर्चा रंगायला लागल्या होत्या. गोव्यात या दोघांना बाईकवर फिरताना देखील पाहिले गेले होते, मात्र दोस्ताना २ चित्रपटाच्या शूटिंगसाठी गोव्यात असल्याचे त्यांच्याकडून स्पष्टीकरण दिले गेले.

मात्र आता या दोघांमध्ये काहीच ऑल वेल नसल्याच्या चर्चानी जोर धरला आहे. सोबतच या दोघांनी एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो देखील केले आहे. यावरून त्याच्यात नक्कीच काहीतरी बिनसले असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.

त्यांच्या या कृतीमुळे या दोघांच्या फॅन्सच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे फॅन्स या दोघांना सतत प्रश्न विचारत आहे. काही फॅन पेजेसने तर असाही दावा केला आहे की, जान्हवीने कार्तिकला ब्लॉक केले आहे. पण काही फॅन पेजेसने या निव्वळ अफवा असल्याचे सांगितले आहे. या आधी कार्तिकचे नाव लव्ह आज कल चित्रपटाच्या वेळी सारा अली खान सोबत देखील जोडले गेले होते, मात्र नंतर त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या आल्या होत्या.

या दोघांच्या दोस्ताना २ च्या चित्रपटाचे पुढील शूटिंग लंडनमध्ये होणार होते, मात्र कोरोनामुळे हे शूटिंग रद्द झाले आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाच्या आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे लंडनचे शूटिंग कॅन्सल झाली आहे.

या दोघांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर कार्तिक सध्या ‘धमाका’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. शिवाय त्याच्या हातात ‘भूल भुलैया २’ देखील सिनेमा आहे. या सिनेमात कार्तिकसोबत कियारा अडवाणी देखील दिसणार आहे.

तर जान्हवी तिच्या आगामी ‘गुड लक जेरी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सोबतच ती राजकुमार रावसोबत ‘रूही अफसाना’ सिनेमातही दिसणार आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.