बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. कार्तिक बर्याचदा अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. कार्तिकचे फोटो आणि व्हिडिओ बरेच मजेदार असतात, जे त्याच्या चाहत्यांना खूप आवडतात. नुकतेच कार्तिकने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या बहिणीची चेष्टा करताना दिसत आहे.
कार्तिक आर्यन आपल्या कुटुंबासोबतचेही अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. कार्तिक बर्याचदा बहीण कृतिका (किट्टू) सोबत मस्ती करताना दिसतो. अशात नुकताच कार्तिकने शेअर केलेला व्हिडिओ बराच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कार्तिक दाखवत आहे की कशाप्रकारे त्याची बहीण मार्चचे तिकीट घेऊन विमानतळावर प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहे. ही गोष्ट कार्तिकला माहित आहे, परंतु असे असूनही तो कृतिकाला काही सांगत नाही आणि शांतपणे तिचा व्हिडिओ शूट करत राहतो.
कृतिका विमानतळाच्या प्रवेशद्वारावर गेल्यावर तिला समजते की, तिचे तिकिट 12 फेब्रुवारीचे नसून 12 मार्चचे आहे. प्रवेशद्वाराकडे जाताना कार्तिक शांतपणे आपल्या बहिणीचा व्हिडिओ बनवत होता. कृतिका प्रवेशद्वाराकडे जाते आणि नंतर सुरक्षा कर्मचारी तिला परत पाठवतात.
जेव्हा बहीण परत येते, तेव्हा कार्तिक तिला “काय झाले?” असे विचारतो. त्यानंतर कृतिका तिच्या डोक्यालाच हात लावते. त्याच वेळी, कार्तिकजवळ उभी असलेली त्यांची आईसुद्धा हसणे थांबवू शकत नाही आणि जोरात हसू लागते. कार्तिक आपल्या बहिणीला विचारतो की “बुकिंग कोणी केली होती?” यावर ती “माझे तिकिट 12 मार्चचे आहे”, असे सांगते. कार्तिकची बहीण त्याला म्हणते की “भाई, आज रात्रीची फ्लाईट पाहा, आई मी अजून किती उशीर करू”.
हा व्हिडिओ रेकॉर्ड करताना कार्तिक आर्यन खूप हसला. व्हिडिओ शेअर करताना कार्तिक आर्यनने लिहिले की, “तारीख ही किट्टूसाठी फक्त क्रमांक आहे.”
कार्तिकच्या या व्हिडिओवर त्याचे चाहतेही खूप हसले आहेत. या मजेदार व्हिडिओवर मजेशीर कमेंट्सही येत आहेत.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-व्हॅलेंटाईन डे स्पेशल! बॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटांनी खऱ्या अर्थाने लोकांना शिकवले प्रेम करायला-अखेर प्रतिक्षा संपली! प्रभासच्या ‘राधे श्याम’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित, अभिनेत्याचा रोमँटिक अंदाज ठरतोय लक्षवेधी
-अभिनेत्री सोनम कपूरने चालू ट्रेनमध्ये केले पतीला ‘किस’, पाहा खास व्हिडिओ