दमदार! जिममध्ये घाम गाळतानाचा दिसला ‘चॉकलेट बॉय’ कार्तिक आर्यन; टोन्ड बॉडी केली फ्लॉन्ट


सोशल मीडियावर अनेक दिलखेचक आणि आकर्षक पोस्ट करून प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवणारा ‘चॉकलेट बॉय’ म्हणजेच अभिनेता कार्तिक आर्यन होय. तो नेहमीच जिममध्ये वर्कआऊट करतानाचे  त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. आता देखील त्याने असेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. जे सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

त्याने या फोटोमध्ये कसरत करण्याऐवजी फोटोशूटसाठी ट्रेनरचे आभार मानले आहेत. सोबतचे हे फोटो मजेशीर अंदाजात शेअर केले आहेत. त्याच्या ट्रेनरसोबत फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “खूप छान फोटोशूट केले आहे.”

टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करत कार्तिक आर्यन नेहमी प्रमाणेच त्याच्या आगामी योजनांबाबत प्रेक्षकांमध्ये कुतूहल तयार करत आहे. त्याचे हे फोटो पाहून त्याचे चाहते आता असा अंदाज लावत आहेत की, कदाचित तो त्याच्या आगामी चित्रपटासाठी ट्रेनिंग घेत आहे. (Kartik Aryan all set to shape up for his next movie, actor work out photo viral on social media)

सोशल मीडिया किंग म्हणून ओळखला जाणारा कार्तिक त्याच्या हटके कॅप्शनसाठी देखील प्रसिद्ध आहे. त्याचे चाहते त्याच्या प्रत्येक पोस्टवर भरभरून प्रतिसाद देत असतात. त्याच्या सेक्सी जिम अवतारासाठी त्याला चाहत्यांकडून खूप कौतुक होत असते. त्याने आता शेअर केलेल्या या फोटोमध्ये देखील तो आकर्षक दिसत आहे.

चित्रपटामध्ये देखील तो अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारण्यासाठी खूप मेहनत घेताना दिसत असतो. त्याच्याकडे आता अनेक प्रोजेक्ट आहेत. तो बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या परफॉर्मन्सने सगळेच मंत्रमुग्ध होत असतात.

कार्तिकने 2011 मध्ये ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ‘कांची द अनब्रेकेबल’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘लुका छुप्पी’, ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तो लवकरच त्याच्या ‘भूल भुलैया’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा आडवाणी ही देखील असणार आहे. यासोबतच तो ‘धमाका’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो एका पत्रकाराची भूमिका निभावताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुशांत सिंग राजपूत जगातील एकमेव नासा ट्रेंड एस्ट्रोनॉट अभिनेता होता’; बहीण श्वेता सिंग कीर्तीने केला खुलासा

-अरे बापरे! ‘इंडियन आयडल १२’मध्ये पवनदीपकडून झाली मोठी चूक; परीक्षकांच्याही उंचावल्या भुवया

-ट्रान्सफॉर्मेशन असावे तर असे! रवी दुबेने ‘इतक्या’ वेळेत कमी केले १० किलो वजन; तुम्हालाही बसणार नाही विश्वास


Leave A Reply

Your email address will not be published.