Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड बॉलिवूड हे आता माझे स्वप्न राहिलेले नाही; करीयरच्या प्रश्नांवर बोलली उर्फी जावेद…

बॉलिवूड हे आता माझे स्वप्न राहिलेले नाही; करीयरच्या प्रश्नांवर बोलली उर्फी जावेद…

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या मालिकांमधून आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणाऱ्या उर्फी जावेदला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. उर्फी कुठेही गेली तरी ती ठळकपणे चर्चेत येते. सध्या उर्फी तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘फॉलो कर लो यार’ या मालिकेमुळे चर्चेत आहे. आता अलीकडे उर्फीने सांगितले की, बॉलिवूड हे आता तिचे स्वप्न राहिलेले नाही आणि तिला भारतातील सर्वात मोठी रिॲलिटी टीव्ही स्टार बनायचे आहे.

उर्फीने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “बॉलिवूड हे आता माझे स्वप्न राहिलेले नाही. मला भारतातील सर्वात मोठा रिॲलिटी टीव्ही स्टार बनायचे आहे आणि एक उद्योजक बनायचे आहे. आज माझ्याकडे करिअरचे अनेक पर्याय आहेत, ज्याबद्दल मला इतके दिवस माहिती नव्हती. 

तिच्या प्रवासाविषयी बोलताना उर्फी म्हणाली, “मी शून्यापासून सुरुवात केली, मी इथे कोणालाच ओळखत नव्हते. मला काम कसं करायचं किंवा काम कसं मिळवायचं हे माहीत नव्हतं. इथे काहीतरी मोठं करायचं माझं स्वप्न होतं. जेव्हा मी इथे आले, मी एका दिवसात अनेक प्रोडक्शन हाऊसचे नंबर शोधले आणि काहींना कामही मागितले.

उर्फीने तिच्या खास बोल्ड फॅशन सेन्समुळे सोशल मीडियावर खूप लोकप्रियता मिळवली आहे. सुरुवातीला खूप टीकेला सामोरे जावे लागल्यानंतर आता इंटरनेटवर सगळेच उर्फीच्या टॅलेंटचे कौतुक करत आहेत. इतकेच नाही तर तिची नुकतीच ‘फॉलो कर लो यार’ ही मालिका प्रदर्शित झाल्यानंतर उर्फीचे स्टारडमही वाढले आहे. इतकेच नाही तर उर्फी कधीकधी तिच्या वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत येते.

उर्फीने “बडे भैया की दुल्हनिया”, “ये रिश्ता क्या कहलाता है”, “कसौटी जिंदगी की” सारख्या टीव्ही शोद्वारे भारतीय मनोरंजन उद्योगात पाऊल ठेवले होते आणि या वर्षाच्या सुरुवातीला तिने दिबाकर बॅनर्जीचा “एलएसडी 2″ केला. ” मध्ये तीने स्वतःचीच छोटी भूमिका केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

पंचायतचा चौथा सिझन होणार लवकरच सुरु; खुद्द दिग्दर्शकाने दिले स्पष्टीकरण…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा