अभिनेत्री कश्मीरा शाह (Kashmera Shah) तिच्या बोल्ड लुकमुळे सतत चर्चेत असते. कश्मीरा ही प्रसिद्ध कॉमेडियन कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) याची पत्नी आहे. तिच्या बोल्ड लुकचे लाखो चाहते आहेत. अलिकडेच, तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहेत. त्या फोटोमध्ये पुन्हा एकदा कश्मीराचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला आहे.
कश्मीरा शाहचे व्हायरल होणारे फोटो तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरवर शेअर केले आहेत. तिचे हे भुरळ पाडणारे फोटो जोरदार शेअर केले जात आहेत. तिच्या या फोटोला चाहत्यांनी खूप पसंती दाखवली आहे. तुम्ही पाहू शकता यामध्ये अभिनेत्री पूलच्या बाजूला बसून फोटोसाठी हॉट पोझ देत आहे.
कश्मीरा शाहचा जन्म २ डिसेंबर १९७१ मध्ये मुंबई येथे झाला. अलिकडेच तिने तिचा ५०वा वाढदिवस खूप धूमधाममध्ये साजरा केला.
खूप कमी लोकांना माहिती आहे की कश्मीरा शाह ही प्रसिद्ध संगीतकार अंजनीबाई लल्लेकर यांची नात आहे. शास्त्रीय संगीतामध्ये कश्मीरा शाहच्या आजीचे खूप मोठे नाव आहे. कश्मीराने तिच्या करिअरची सुरूवात १९९४ मध्ये एका टीव्ही शोद्वारे केली होती. या शोचे नाव ‘हॅलो बॉलिवूड’ असे होते.
कश्मीराने १९९७ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘येस बॉस’ हा तिचा सर्वात पहिला चित्रपट होता. तिने केवळ हिंदी सिनेमाच नाही, तर तमिळ, तेलगु, मराठी आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले. ‘साजिश’, ‘प्यार तो होना ही था’, ‘कहीं प्यार ना हो जाये’, ‘हिंदुस्तान की कसम’, ‘वास्तव’, ‘हेरा फेरी’, ‘जंगल’, ‘आंखे’, ‘मर्डर’, ‘जहरीला’, या सर्व चित्रपटांमध्ये ती दिसली आहे.
कश्मीरा शाहने अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉंग देखील केले आहेत. तिच्या नृत्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. कश्मीरा अनेक रियॅलिटी शोमध्ये देखील दिसलीये. तिने ‘बिग बॉस सीझन १’मध्ये कंटेस्टेंट म्हणून तिने भाग घेतला होता. त्यानंतर २००७ मध्ये कश्मीरा आणि कृष्णाने डान्स रियॅलिटी शो ‘नच बलिये सीझन ३’ मध्ये सहभाग घेतला होता. २००८ मध्ये ‘कभी प्यार कभी कभी यार’ या शोमध्ये देखील ती सहभागी झाली होती आणि या शोची ती विजेता देखील झाली होती .
हेही वाचा-