रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांचा आगामी चित्रपट ‘८३’ हा येत्या २४ डिसेंबर रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून, रणवीर आणि दीपिका देखील लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्रित काम करणार आहेत. या चित्रपटाचा प्रीमियर झाला असून अनेक मोठमोठ्या सेलिब्रिटींनी या प्रीमियरला हजेरी लावली होती. बॉलीवूड सेलिब्रिटी ‘८३’ चित्रपटाविषयी सतत सोशल मीडियावर कमेंट करताना दिसत आहे. आता बॉलिवूड अभिनेता सुनिल शेट्टीने ‘८३’ पाहिल्यानंतर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. सुनील शेट्टीच्या प्रतिक्रिया बद्दल सगळीकडे खूप चर्चा सुरू आहे. सुनील शेट्टीने ट्विटद्वारे ‘८३’ चित्रपटाविषयी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Went to watch @RanveerOfficial in #83. Couldn’t spot him. There was only #KapilDev on screen. Incredible transformation. I am stunned beyond. A team cast that could’ve walked off Lords. Got gooseflesh like I was reliving ‘83. Still shaken & teary-eyed at the artistry & emotions. pic.twitter.com/IW8zGYNsyc
— Suniel Shetty (@SunielVShetty) December 20, 2021
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण चित्रपटाबद्दल सुनील शेट्टी यांनी असे लिहिले आहे की, “‘८३’ हा चित्रपट पाहून माझ्या अंगावर खरोखरच काटा आला. या चित्रपटात रणवीर सिंगचे खूपच चांगले ट्रान्सफॉर्मेशन केले गेले आहे. त्याला या चित्रपटात पाहून आणि त्याचा अभिनय पाहून मला, माझ्या आश्चर्याला कुठल्याही प्रकारच्या सीमा उरल्या नाहीत. ज्या प्रभावी पद्धतीने आणि भावनांनी त्याने या सिनेमात उत्कृष्ट अभिनय केला आहे तो पाहून आपल्या सर्वांच्या अंगावर रोमांच आल्याशिवाय राहणार नाही. सोबतच हा सिनेमा पाहताना डोळे देखील नक्कीच भरून येतील. हा चित्रपट पाहून असे वाटते की कबीर खानने खूप उत्कृष्ट चित्रपट बनवला आहे. त्याची स्टोरी आणि सिनेमांमधील सर्व सीन्स पाहून असे वाटते की, या चित्रपटातील कलाकारांनी खूप मेहनत केली आहे. या चित्रपटातील सर्व पात्रांनी माझे मन जिंकले आहे.”
रणवीर सिंगने ‘८३’ या चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारली आहे. तर दीपिका पादुकोणने या चित्रपटात कपिल देव यांच्या पत्नीची रोमी देव यांची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हिंदीत नाहीतर वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित होणार आहे. तमिळ, तेलुगू ,कन्नड आणि मल्याळम भाषेमध्ये ३ डी मध्ये रिलीज होणार आहे.
हेही वाचा-