विकी आणि कॅटरिनाच्या लग्नाची नियमावली जाहीर, लग्नात मोबाईल वापरण्यास असणार बंदी


बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि कॅटरिना कैफ हे सध्या लग्नामुळे खूप चर्चेत आले आहे. ते दोघे पुढील महिन्यात राजस्थानमध्ये लग्न करणार आहेत अशा बातम्या येत आहेत. परंतु याबाबत त्या दोघांनी अजूनही कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यांच्या लग्नाबाबत एक अपडेट आले आहे की, ते दोघेही त्याच्या लग्नात काही नियमावली ठेवणार आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, विकी आणि कॅटरिनाच्या लग्नात पाहुण्यांना मोबाईल आणण्यास बंदी असणार आहे. त्यांच्या मर्जी विरोधात कोणीही त्यांच्या लग्नात फोटो आणि व्हिडिओ काढू शकणार नाही. त्यांच्यासाठी हा खास दिवस आहे. त्यामुळे त्यांचे हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल व्हावेत अशी त्याची अजिबात इच्छा नाही. ते दोघेही सध्या त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी करत आहे. तसेच त्यांची टीम या गोष्टीची पूर्ण काळजी घेत आहे की, त्यांच्या लग्नाची माहिती आधीच कोणाला समजणार नाही. (katrina kaif and vicky kaushal wedding guest will not use phone know who bollywood celebs are invited)

माध्यमातील वृत्तानुसार लग्नाच्या जागेशिवाय पाहुण्यांना मोबाईल वापरण्याची परवानगी असणार आहे. त्यांच्या लग्नात काही कलाकार आणि त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती उपस्थित असणार आहे. खरंतर या आधी देखील अनेक कलाकारांनी त्यांच्या लग्नात मोबाईल न वापरण्याचा नियम केला होता. यात प्रियांका चोप्रा आणि निक जोनास, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी त्यांच्या लग्नात जे नियम बनवले होते त्यात मोबाईल न वापरण्याचा नियम केला होता.

विकी आणि कॅटरिनाच्या लग्नात येणारी पाहुण्यांची यादी देखील समोर आली आहे. त्यांच्या लग्नात करण जोहर, कबीर खान, मिनी माथूर, रोहित शेट्टी, कियारा आडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, नताशा दलाल या कलाकारांना आमंत्रण दिले आहे. यासोबत लोकल कार रेंटने घेतल्या आहेत तसेच सिक्युरिटी सर्व्हिस देखील बुक केली आहे. त्यामुळे पाहुण्यांना त्रास होणार नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

काय सांगता! चक्क आमिर खानने मागितली केजीफ स्टार यशची माफी

मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटावर मुलगा अरहानची ‘अशी’ होती प्रतिक्रिया

अरे वा! ‘मोनिशा’ आणि ‘अनुपमा’ची झाली भेट, या भेटीचा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल


Latest Post

error: Content is protected !!