बॉलिवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कॅटरिना कैफच्या (Katrina Kaif) आगामी ‘टायगर ३’ (Tiger 3) चित्रपटाची प्रदर्शनाआधीच सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. धमाकेदार कथा आणि दोन्ही स्टार कलाकारांचा जबरदस्त अभिनय यामुळे या चित्रपटाचे आधीचे दोन्हीही भाग प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत. त्यामुळेच चाहत्यांना सलमान आणि कॅटरिनाच्या या बहुचर्चित चित्रपटाची त्यांच्या चाहत्यांना जोरदार उत्सुकता लागली आहे. पण या चित्रपटामध्ये सलमान खानपेक्षा कॅटरिनाचीच भूमिका लक्षवेधी ठरत आहे , ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाका करणार आहे. दोघेही त्यांच्या मोस्ट अवेटेड चित्रपट ‘टायगर 3’मुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात कॅटरिना अॅक्शनच्या बाबतीत बॉलिवूडमधील बड्या स्टार्सना मागे सोडणार आहे. हे यशराज फिल्म्सने शेअर केलेला अलीकडील व्हिडिओ पाहून दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक्शन मोडमध्ये कॅटरिना कैफची भूमिका पाहून चाहते अवाक झाले आहेत. ‘टायगर 3’ हा टायगर फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट आहे, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यशराज फिल्म्सने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये कॅटरिना कैफला जबरदस्त एक्शन करताना पाहून चाहते थक्क झाले आहेत.
कॅटरिना कैफच्या नवीन व्हिडिओबद्दल सांगायचे तर, व्हिडिओमध्ये कॅट एक्शन मोडमध्ये दिसत आहे. ती रिंगमध्ये किक आणि पंचांसह सराव करताना दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा स्पोर्ट्स आउटफिट कॅरी केला आहे. चाहते सतत व्हिडीओवर कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. यशराज फिल्म्स निर्मित ‘टायगर 3’ पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. सोशल मीडियावर चित्रपटाचे व्हिडीओ आणि फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढत आहे. पुढच्या वर्षी 21 एप्रिलला ‘टायगर 3’ मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
दरम्यान ‘टायगर 3’ 2023 मध्ये रिलीज होणार आहे. टायगरचा पहिला भाग ‘एक था टायगर’ होता, हा चित्रपट 2012 मध्ये रिलीज झाला आणि त्यानंतर 2017 मध्ये रिलीज झालेला ‘टायगर जिंदा है’. आता ‘टायगर 3’मध्येही सलमान खान आणि कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सलमान खान, कॅटरिना कैफ आणि इमरान हाश्मी स्टारर ‘टायगर 3’ चित्रपटाचे शूटिंग अंतिम टप्प्यात आहे.