Sunday, June 4, 2023

सलमान खानच्या हत्येच्या कटाचे सत्य पाहून उडेल होश; लॉरेन्सचा भाऊ म्हणाला, ‘त्याने माफी मागावी, मगच…’

अलीकडेच सलमान खानचे (Salman Khan) वडील सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचे पत्र आले होते. ज्यामध्ये सलमानची सिद्धू मूसेवालाप्रमाणे (Sidhu Moosewala) हालत करणार, असे म्हटले होते. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा कडक करण्यात आली आहे. त्याचबरोबर याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अलीकडेच लॉरेन्स बिश्नोईच्या धर्म भाऊने, सलमान खान हे त्याचे पुढचे लक्ष्य असल्याचे म्हटले आहे. काळवीट मारल्याबद्दल सलमान खानने माफी मागितली तरच तो त्याला सोडेल.

एका मुलाखतीदरम्यान, जेव्हा लॉरेन्स बिश्नोईच्या धर्म भाऊ राजवीर सोपूला सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुढील लक्ष्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने थेट सलमान खानचे नाव घेतले. राजवीर सोपू म्हणाला, “सलमान खानने काळवीट मारले असून, तो सर्व खटल्यातून निर्दोष सुटला आहे. हरणांना मारून त्याने मोठी चूक केली आहे. भविष्यात सलमानचे काम आम्ही करू, असे आम्ही उघडपणे सांगत आहोत, त्यात कोणताही ट्विस्ट नाही.” (lawrence bishnois brother reason for murdering salman khan)

यानंतर जेव्हा राजवीर सोपूची मुलाखत घेणाऱ्याने ‘तू माझ्या मुलासारखा आहेस, स्वतः जगा आणि लोकांनाही जगू द्या,’ असे म्हटले. यावर राजवीर म्हणाला, “तुम्हाला वचन देतो, सलमानचे काम करून टाकेल. त्यानंतर तू एकही काम करणार नाहीस.” त्याचवेळी त्याने सांगितले की, सलमानने आपली चूक कधीच मान्य केली नाही, फक्त एक मुलाखत दिली. त्याने चूक मान्य केली असती तर माफ केले असते. ‘सलमानने आता माफी मागितली तर? असे राजवीरला विचारण्यात आले. यावर राजवीर म्हणाला की, सलमानने माफी मागितली तर त्याची सुटका होईल.

दोन दिवसांपूर्वी सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते. त्याचवेळी चार वर्षांपूर्वी लॉरेन्स बिश्नोईनेही सलमान खानला मारण्याची घोषणा केली होती. सलमान जेव्हाही जोधपूरला येईल तेव्हा त्याला मारून टाकू, असे तो म्हणाला होता. लॉरेन्स सध्या तुरुंगात आहे, परंतु त्याचे गुंड सर्वत्र पसरलेले आहेत. अशा परिस्थितीत सलमान खानचा धोका वाढला असून, मुंबई पोलीस त्याच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा