Monday, July 1, 2024

फिटनेस असावा तर असा! अभिनेत्री कॅटरिना कैफने शेअर केला अवघड वर्कआऊट व्हिडिओ, पाहून तुम्हालाही फुटेल घाम

आजकाल सगळ्याच अभिनेत्री सौंदर्यासोबतच त्यांच्या फिटनेसकडे जास्त लक्ष देताना दिसतात. व्यायाम करताना आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करून त्याबाबत त्यांच्या चाहत्यांना माहिती देत असतात. अशातच बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ ही सोशल मीडियावर तिच्या फिटनेसचे व्हिडिओ शेअर करताना दिसत आहे.

तिने पुन्हा एकदा जिममधील तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती अवघड वर्कआऊट खूप मन लावून आणि मेहनतीने व्यायाम करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ बघून भल्या‌भल्यांना घाम फुटला आहे.

कॅटरिना कैफने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “काही नव्या गोष्टी शिकत आहे. माझी गती वाढवायचा प्रयत्न करत आहे. मी यासाठी स्वतःवर कसल्याही प्रकारची जबरदस्ती करत नाही. हे आपोआपच माझ्याकडून होत आहे.” तिचा हा व्हिडिओ पाहून लक्षात येत आहे की, ती कोणत्यातरी खास गोष्टीची तयारी करत आहे.

कॅटरिना कैफ ही सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टर यांच्यासोबत ‘फोन भूत’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे. तसेच ती लवकरच ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूर्यवंशी हा चित्रपट कोरोनामुळे रिलीझ होण्यापासून थांबला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-म्हणून सपनाला देसी क्वीन म्हणतात! अवघ्या काही दिवसांत सपनाच्या ‘या’ गाण्याला मिळालेत २ कोटी व्ह्यूज

-‘भेडिया’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री क्रिती सेननने धक्का दिल्यानंतर पाण्यात पडता पडता वाचला वरुण धवन, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-मेगा स्टार चिरंजीवी आणि राम चरणच्या ‘आचार्य’ चित्रपटातील पहिले गाणे रिलीझ, अभिनेत्याच्या डान्स मुव्हजची होतेय प्रशंसा

हे देखील वाचा