Sunday, April 19, 2026
Home साऊथ सिनेमा धक्कादायक! सलमान खाननंतर सिनेसृष्टीत पुन्हा एकदा मिळाली जीवे मारण्याची धमकी, पण कुणाला?

धक्कादायक! सलमान खाननंतर सिनेसृष्टीत पुन्हा एकदा मिळाली जीवे मारण्याची धमकी, पण कुणाला?

गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींना जीवे मारण्याच्या धमक्या मिळण्याच्या घटना वाढत आहेत. गायिका सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) याच्या मृत्यूनंतर बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांनाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. आता ‘बाहुबली २’ अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा (Anushka Shetty) भाऊ गुणरंजन शेट्टीलाही जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत.

अनुष्का शेट्टीच्या भावाला मिळतायेत जीवे मारण्याच्या धमक्या
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुष्का शेट्टीचा भाऊ गुणरंजनला गेल्या काही दिवसांपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. व्यवसायातून राजकारणात आलेल्या गुणरंजन याने कर्नाटक सरकारकडे आपल्या संरक्षणाची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाबाबत कर्नाटक राज्याचे गृहमंत्री अराग ज्ञानेंद्र यांना पत्र पाठवण्यात आले आहे. (After salman Khan this celebrity get death threat)

काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुणरंजनला मिळालेल्या धमक्यांचे संपूर्ण प्रकरण मानवीथ राय याच्याशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. कथित रित्या गुणरंजन आणि मानवीथ हे दिवंगत डॉन मुथप्पा राय यांच्यासोबत काम करायचे. मात्र, २०२० मध्ये मुथप्पाच्या मृत्यूनंतर त्यांचे नाते बिघडले, त्यामुळे दोघांचे मार्ग वेगळे झाले. नंतर गुणरंजन राजकारणात आला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुणरंजनचा असा विश्वास आहे की, त्याला ज्या धमक्या येत आहेत त्या मानवीथशी संबंधित आहेत. मात्र, मानवीथने त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मानवीथने तर गुनरंजनशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले आहे.

अभिनेत्री अनुष्का शेट्टी ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘बाहुबली’ चित्रपटानंतर तिला संपूर्ण भारतात ओळख मिळाली. चित्रपटातील तिचे देवसेना नावाचे पात्र सगळ्यांना खूप आवडले होते. तिने तमिळ, तेलुगू आणि कन्नडसोबत इतर भाषांमध्ये देखील काम केले. तिने जवळपास ३० चित्रपटात काम केले. सध्या ती साऊथमधील सर्वात महागडी अभिनेत्री आहे. तिने ‘स्टालिन’, ‘डॉन’, ‘अरुंधती’, ‘सिंघम’, ‘ओक्का मागाडू’, ‘बाहुबली’, ‘निःशब्दम’, ‘रुद्रमादेवी’, ‘लिंगा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा